pornographic case : अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज पोर्नोग्राफी केसमध्ये न्यायालयातून जामीन मिळाला. राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबईच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राने 2 महिने तुरुंगात घालवले. Mumbai court grants bail to shilpa shetty husband Raj Kundra in pornographic case
वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज पोर्नोग्राफी केसमध्ये न्यायालयातून जामीन मिळाला. राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबईच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राने 2 महिने तुरुंगात घालवले.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा बराच काळ तुरुंगात होता. राजवर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते अॅपवर सादर करणे असे गंभीर आरोप आहेत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सुमारे 1500 पानांचे आरोपपत्रही दाखल केले होते. पण आता अखेर राज कुंद्राने जामीन मिळवला आहे.
19 जुलैपासून तुरुंगात
राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता आणि तेव्हापासून सतत न्यायालयातून जामिनासाठी विनवणी करत होता. अशा परिस्थितीत आज बऱ्याच दिवसांनी त्याला जामीन मंजूर झाला आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टाने राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
राजविरुद्ध सबळ पुरावे
हॉटशॉट अॅपची स्थापना आर्मस्प्राईम लिमिटेडने केली होती, ज्यामध्ये राजकुंद्र आणि सौरभ कुशवाह हे संचालक होते. 35% हिस्सा असणाऱ्या कुशवाह यांनी पोलिसांना सांगितले होते की, व्हिडिओ अपलोड करण्यासह अॅपचे नियंत्रण राज कुंद्राच्या हातात आहे.
एवढेच नाही तर कुशवाहने म्हटले की, हॉटशॉट यूकेस्थित केनरीन लिमिटेडला विकले गेले आणि राजकुंद्रने विक्रीच्या एक दिवस आधी आर्मप्राइमचे संचालकपद सोडले. तर राजची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आरोपपत्रात साक्षीदार म्हणून सादर करण्यात आले आहे. शिल्पा म्हणाली की, ती बिझी होती, तिने पतीला त्याच्या कामाबद्दल विचारले नाही.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने 2015 मध्ये वियान इंडस्ट्रीजची सुरुवात केली होती. वियान इंडस्ट्रीज अॅनिमेशन, कार्टून आणि अॅप्स बनवायची. गुन्हे शाखेने या वर्षी फेब्रुवारीमध्ये या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि राजचा पीए उमेश कामतला अटक केली, तेव्हा शिल्पाने तिच्या पतीला याबद्दल विचारले होते.
Mumbai court grants bail to shilpa shetty husband Raj Kundra in pornographic case
महत्त्वाच्या बातम्या
- मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
- Corona Vaccine : गर्भवती महिला आणि नवजात बालकांवर लसीचा काय परिणाम होतो? सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर
- इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी तालिबानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, सीरियल बॉम्बस्फोटांचा केला दावा
- रशियाच्या पर्म स्टेट युनिव्हर्सिटीत माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार, 8 विद्यार्थी ठार, अनेक जण जखमी
- Punjab CM Oath : चरणजीतसिंग चन्नी झाले पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री, ओपी सोनी आणि सुखजिंदर रंधावा यांनीही घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ