विशेष प्रतिनिधी
मुबंई : 28 वर्षीय एका अभिनेत्रीने मुंबईत 23 डिसेंबर रोजी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारण अतिशय विचित्र आहे. दोन लोकांनी तिला आम्ही एनसीबीचे ऑफिसर आहोत असे सांगून तिच्याकडे 40 लाखांची मागणी केली होती. त्या नंतर याच दोघानी तिच्याकडून 20 लाखांची मागणी केली.
Mumbai actress was blackmailed by fake NCB officer, Actress commits suicide, Nawab malik trolls NCB
ही अभिनेत्री 20 डिसेंम्बर रोजी हुक्का पार्लरमध्ये गेली होती. अभिनेत्री आपल्या दोन मित्रांसोबत हुक्का पार्लरमध्ये गेली होती. या दोन मित्रांचा देखील संबंधित दोषी व्यक्तींसोबत संबंध असू शकतो असे पोलिसांनी सांगितले आहे.
दोषी व्यक्तींनी अभिनेत्री सोबत संपर्क साधला आणि तुम्हाला ड्रग प्रकरणामध्ये अडकवू असे देखील सांगितले होते. या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केलेली आहे. पाेलिसांनी सेक्शन 360, 170, 420, 383, 388, 389, 506 आणि 120ब अंतर्गत या दोघांवर केस दाखल केली आहे.
या घटनेनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी वर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. नेते नवाब मलिक यांचे म्हणणे असे आहे की, एनसीबीची स्वतःची एक प्रायव्हेट आर्मी आहे. जे बॉलिवूड तसेच बड्या लोकांकडुन पैसे उकळण्याचे काम करतात.
नवाब मलिक म्हणतात, एनसीबीचे स्वतःचे एक extortion रॅकेट मुंबईमध्ये चालूच असते आणि या सर्वामागे एनसीबी आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. याआधी देखील गोसावी आणि भानुशाली या दोघांना आपण एक्सपोज केलेच होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
Mumbai actress was blackmailed by fake NCB officer, Actress commits suicide, Nawab malik trolls NCB
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदनगर मधील जवाहर नवोदय विद्यालयांमधील 52 विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण
- नागालँडमधून AFSPA हटवण्याबाबत समितीची स्थापना, मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची घोषणा
- ख्रिसमस निमित्त सांता क्लॉजचा ड्रेस घातलेल्या 100 स्त्रियांनी बंगलोर मध्ये ऑर्गनायझ केली बाईक रॅली
- पुलवामा येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला ; हल्ल्यात दोन पोलीस जखमी