९० मिली क्षमतेच्या रिकामी बाटल्या असल्याचे सांगून त्याच्या ऐवजी हे रक्त चंदन युएईला पाठवण्यात येणार होते.परंतु पाठवण्यापूर्वीच कारवाई दरम्यान त्याला पकडण्यात आले.Mumbai: 15,000 kg of sandalwood seized from Nhavasheva port; Blood sandalwood costs Rs 15 crore
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : सीमाशुल्क विभागाने आज नवी मुंबई येथील न्हावाशेवा बंदरात १५ हजार २०किलो रक्तचंदन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची किंमत १५ कोटी रुपये आहे.हे रक्तचंदन आखाती देशात ते पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.युनायटेड अरब अमिराती(युएई) येथे पाठवण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटल्यांच्या कंटेनरमध्ये हे रक्तचंदन सापडले.
९० मिली क्षमतेच्या रिकामी बाटल्या असल्याचे सांगून त्याच्या ऐवजी हे रक्त चंदन युएईला पाठवण्यात येणार होते.परंतु पाठवण्यापूर्वीच कारवाई दरम्यान त्याला पकडण्यात आले. त्यात १५ हजार २० किलो रक्त चंदन सापडले आहे.सीमाशुल्क विभागाच्या विशेष तपास व गुप्तवार्ता शाखेने ही मोठी कारवाई केली. त्यांना न्हावाशेवा बंदारवरून आखाती देशात रक्तचंदन पाठवले जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार जेएनपीटी येथील जीटीआय टर्मिनस येथे शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान हे रक्तचंदन जप्त करण्यात आले.