Thursday, 1 May 2025
  • Download App
    MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली! मागील वर्षी कमाल वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी पून्हा परीक्षा देता येणार | MPSC exam postponed again! Students who passed the maximum age limit last year will be able to appear for exam this year

    MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली! मागील वर्षी कमाल वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी पून्हा परीक्षा देता येणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील राजकारण आणि कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा झालेल्या नाहीयेत. ह्यात विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. तर आता 2 जानेवारी रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

    MPSC exam postponed again! Students who passed the maximum age limit last year will be able to appear for exam this year

    1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पात्र ठरण्यासाठीची कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी, म्हणजेच त्यांना पुन्हा परीक्षेला बसता यावे यासाठीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2 जानेवारी 2022 रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे.


    MPSC Student Suicide : पुन्हा एक आत्म’हत्या’…. ? ‘सॉरी! काहीही सकारात्मक चित्र दिसत नाहीये’… MPSC च्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य


    17 डिसेंबर 2021 रोजी शासन निर्णय याबाबत जाहीर करण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणी साठी आयोगामार्फत रविवारी 2 जानेवारी रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहे. आणि पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

    ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी 28 डिसेंबर 2021 ते 1 जानेवारी 2022 रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्कासह अर्ज भरायचे आहेत.

    MPSC exam postponed again! Students who passed the maximum age limit last year will be able to appear for exam this year

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!