• Download App
    खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह, पती सदानंद सुळे यांनाही लागण । MP Supriya Sule corona positive, husband Sadanand Sule also infected

    खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह, पती सदानंद सुळे यांनाही लागण

    राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे यांचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. MP Supriya Sule corona positive, husband Sadanand Sule also infected


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे यांचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

    आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, “मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या”.



    राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात त्याचबरोबर निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नातही सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या अनेकांच्या संपर्कात आल्या असल्याची शक्यता आहे.

    राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणाल्या, मला आज सकाळी कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करत आहे.

    MP Supriya Sule corona positive, husband Sadanand Sule also infected

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !