• Download App
    सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे; खासदार संभाजीराजेंच्या ट्विटनंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ|MP Sambhaji Raje twittes, i am under servillence by GOVT

    सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे; खासदार संभाजीराजेंच्या ट्विटनंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या खासदार संभाजी राजे यांनी आज सायंकाळी अचानक एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. सरकार माझ्यावर पाळत ठेवते आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.MP Sambhaji Raje twittes, i am under servillence by GOVT

    पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



    संभाजी राजे यांच्या ट्विटनंतर राज्यात विविध राजकीय चर्चांना जोरदार उधाण यायला सुरूवात झाली आहे. आजच्या दिवसाची सुरूवातच एका खळबळजनक घटनेने झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली

    तर सायंकाळ संभाजी राजे यांच्या खळबळजनक ट्विटने उजाडली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सगळे काही आलबेल सुरू नाही, याचाच राजकीय संदेश सर्वदूर गेला आहे.

    मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली. एक तर त्यांनी ६ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खासदारकीचाही राजीनामा देऊ, असे त्यांनी सांगितले आहे. बहुजन समाजाची इच्छा असेल तर वेगळा पक्ष काढू, असे सूतोवाचही त्यांनी केले आहे.

    संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांसकट विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणे जूळत असल्याच्या बातम्या चालू झाल्या.

    यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच बरोबर राज्यात नव्या समीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे.

    MP Sambhaji Raje twittes, i am under servillence by GOVT

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस