मराठा आरक्षणप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एसईबीसी आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नसल्याचे यावरून स्पष्ट झालं आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती केली पाहिजे. MP Sambhaji Raje Chhatrapati tell Two Options For Maratha Reservation After SC Denied Review Petition OF Central Govt
विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा आरक्षणप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एसईबीसी आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नसल्याचे यावरून स्पष्ट झालं आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती केली पाहिजे.
पुण्यातून खासदार संभाजीराजेंनी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खा. संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आता दोनच पर्याय उरले आहेत. 102व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार शाबूत असल्याचं केंद्राने पुनर्विचार याचिकेत म्हटलं, सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळलं. यामुळे आता राज्याकडे पर्याय नाहीत. यासाठी आता राज्याने 318 ब च्या माध्यमातून मागासवर्ग आयोग तयार करून गायकवाड आयोगाच्या अहवालातील त्रुटी दूर कराव्यात. सर्व डाटा गोळा करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना पाठवावा. यानंतर राष्ट्रपतींना वाटल्यास ते 342 अ नुसार केंद्रीय मागास आयोगाकडे हे पाठवू शकतात. मग ते राज्य मागास आयोगाला पाठवतील. यानंतर राष्ट्रपतींना वाटल्यास, ते संसदेला देऊ शकतात.
केंद्राला स्पष्ट करावी लागेल भूमिका
संभाजीराजे पुढे म्हणाले की, यात दुसरा एक पर्याय आहे. तो म्हणजे केंद्र सरकारने वटहुकूम काढल्यास घटना दुरुस्तीचा मार्ग मोकळा होईल. घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार मिळेल. आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, हे केंद्र सरकारला ठरवावं लागेल. राज्याला तसेच केंद्राला एकमेकांकडे बोट दाखवता येणार नाही. राज्य सरकार फारतर शिफारस करू शकते, केंद्राचीच भूमिका मुख्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
जनसंवाद दौरा
संभाजीराजे म्हणाले की, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मूक आंदोलन झाले. सध्या या आंदोलनांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आम्ही जनसंवाद दौरा सुरू केला आहे. पुण्याच्या वाघोलीतून या दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मराठवाडा आणि विदर्भात जाऊन तिथल्या मराठा संघटनांशी संवाद साधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
MP Sambhaji Raje Chhatrapati tell Two Options For Maratha Reservation After SC Denied Review Petition OF Central Govt
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हायला नको होती, कितीही आपटा, जिंकणार आम्हीच!
- नव्या IT नियमांनंतर Koo आणि गुगलने सोपवला अहवाल, सांगितले किती तक्रारी आल्या आणि काय कारवाई केली?
- पुलवामात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू
- बंगालचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादळी होण्याची शक्यता, ममता सरकारने दिलेले अभिभाषण वाचण्यास राज्यपालांचा नकार
- मुंबईत आणखी एक बनावट कोरोना लसीकरण शिबीर उघडकीस, पाच जणांना अटक