पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. MP Barne files complaint against PCMC Rs 700 crore scam at Delhi ED office
विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेतील कथिक घोटाळ्याप्रकरणी दिल्लीत जाऊन ईडीकडे तक्रार केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे दिल्लीच्या ईडी कार्यालयात गेले आहेत.
शहराचा विकास होत नाही. इथं भ्रष्टाचाराला पोषक वातावरण तयार केलं जातंय. या भ्रष्टाचारात स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. ठेकेदार केवळ नावापुरता राहिले आहेत. अशी पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यायांना पत्र लिहलंय. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली ७०० कोटींच्या निधीबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सोमय्यांना हे पत्र लिहलं आहे. ११ ऑक्टोबरला संजय राऊतांनी हे पत्र लिहलं होतं.
नेमक पत्रात काय म्हटल होत
तुम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आरोप करत असता. त्यामुळे एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. काही दिवसांपूर्वीच मी पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता, त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्र हाती लागली. त्यानुसार, २०१८-१९ मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड कंपनीला ७०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते.
पण त्यांनी ५० टक्के सुद्धा काम केलं नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा हा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा फायदा झाला आहे, त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीसाठी मागणी करावी, असं संजय राऊत यांनी सोमय्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
पूढे राऊत यांनी या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आणि कागदपत्र हे तुम्हाला देतो. या कंपनीने मोठा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी तुम्ही नेहमीप्रमाणे ईडीकडे चौकशीसाठी मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल अशी अपेत्रा राऊत यांनी सोमय्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केली.
MP Barne files complaint against PCMC Rs 700 crore scam at Delhi ED office
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान