• Download App
    देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Most of the infrastructure works in the country are underway in Maharashtra  Chief Minister Eknath Shinde

    देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महारेलच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपुलांचे ऑनलाईन भूमिपूजन

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. म्हणजेच महारेलच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपुलांचे ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडले. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हेदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. Most of the infrastructure works in the country are underway in Maharashtra  Chief Minister Eknath Shinde

    याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील कांबळे, महारेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आणि इतर सर्व अधिकारी, शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उड्डाणपूल प्रत्यक्षात बांधणे हे मोठे कठीण काम असते. रेल्वे वाहतूक सुरू ठेवून ही कामे पुर्ण करताना अधिक वेळ लागतो. महारेलने चांगले काम केले आहे. तसेच, राज्य आणि केंद्र एकत्र आल्यानंतर राज्यात चांगली कामे उभी राहत असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

    याशिवाय, रेल्वेचे प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. एकाच वेळी ९ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. आज केंद्राकडून अनेक विकासकामे होत आहे. मडगाव-मुंबईच्या रुपाने चौथी वंदेभारत रेल्वे महाराष्ट्राला मिळाली. नागपूरमध्येही अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले. अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

    मुंबई-पुणे महामार्गाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीला गती मिळाली आहे. खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असा जगातला मोठा भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाद्वारे देखील नागरिकांचा वेळ वाचत आहे, तसेच प्रदूषणही कमी होत आहे. याचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला आहे. अशा मार्गांचा जनतेला फायदा होतो. पुणे मेट्रो, पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येत आहे. कात्रज चौक ते खडीमशीन मोठा पूल तयार केल्यास नागरिकांना त्याचाही निश्चितच लाभ होईल. महाबळेश्वर येथील मार्ग केंद्राने केल्यास पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल.

    महाराष्ट्राला फाटकमुक्त करण्यासाठी उड्डाणपुलांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येतील. मुंबई मेट्रो, शिवडी-न्हावाशेवा पुलाचे काम, नागपूर-गोवा मार्ग असे अनेक प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. नागरिकांचा वेळ वाचावा आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. देशात पायाभूत सुविधांचे सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचीही मदत मिळत असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

    राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत आहे. आपल्याकडे क्षमता आहे, दळवळण सुविधा आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या राज्यभरात येत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचा निश्चितच राज्य पुढे नेण्यासाठी आपल्याला उपयोग होईल असे यासमयी बोलताना स्पष्ट केले.

    Most of the infrastructure works in the country are underway in Maharashtra  Chief Minister Eknath Shinde

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस