केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा मुंबई कोअर कमिटीची पार पडली बैठक
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात आज सह्याद्री अतिथीगृहावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीबाबत भाजपाच्या मुंबई कोअर कमिटीच्या दोन सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला व मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी बैठकीबाबत माहिती दिली. More than 150 corporators of Mahayuti will be elected in Mumbai Municipal Corporation Ashish Shelar
आशिष शेलार म्हणाले, ‘’महायुतीचे म्हणजेच भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना, रामदास आठवलेंची आरपीआय आणि मित्रपक्ष. १५० पेक्षा जास्त जागांचं आमचं उद्दिष्ट आहे, त्याचं नियोजन, त्याचं धोरण, त्याचा कार्यक्रम, त्याची कार्यपद्धती, रचना, व्यूव्हरचना या सगळ्यांचा परिपूर्ण आराखडा तयार करून आम्ही कामाला लागलो आहोत.’’
याचबरोरबर मुंबई महापालिकेचं वेळापत्रक ठरवणाऱ्या या बैठका होत्या का? या प्रश्नाला उत्तर देताना शेलार म्हणाले, ‘’मुंबई महापालिका निवडणूक कधी लागेल हा एक मिलियन डॉलर प्रश्न आहे. समस्त मुंबईकर आणि आम्ही सगळेच त्याची वाट पाहतो आहोत. उद्या जरी निवडणूक जाहीर झाली तरी उद्याची सुद्धा आमची तयारी आहे. पण त्या बैठका निवडणुकीचं वेळापत्रक ठरवणाऱ्या नव्हत्या, असूच शकत नाहीत.’’
याशिवाय ‘’एक नक्की गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्या १३ मुंबई कोअर कमिटीच्या सदस्यांबरोबर चर्चा केली, बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी दिलेल्या निर्देशानुसार एक सात कलमी कार्यक्रम मुंबई महापालिका निवडणुकीअगोदर मुंबईकरांची सेवा, मुंबईचा महापौर महायुतीचा बसवून कसा करायचा, याचं धोरण आम्ही स्पष्टपणे आखलेलं आहे. त्यानुसार नियोजन केलेलं आहे.’’ असंही आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं.
More than 150 corporators of Mahayuti will be elected in Mumbai Municipal Corporation Ashish Shelar
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : गँगस्टर अतिक अहमदच्या 44 वर्षांच्या गुन्ह्यांची कहाणी, दहशतीचा एका मिनिटात झाला अंत
- अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!
- प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!
- BREAKING NEWS : माफिया डॉन अतिक अहमदची भाऊ अशरफसह गोळ्या झाडून हत्या!