• Download App
    धक्कादायक!कोरोना लसीचे २ डोस घेऊनही अभिनेते मोहन जोशींना झाली कोरोनाची लागण। Mohan Joshi tests positive for COVID-19 after taking both doses of Vaccine

    धक्कादायक!कोरोना लसीचे २ डोस घेऊनही अभिनेते मोहन जोशींना झाली कोरोनाची लागण

    मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम तसेच लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे मोहन जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. 


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक कलाकारांना देखील कोरोनाचा विळखा घातला आहे. मराठी अभिनेते मोहन जोशी यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे स्वतः सोशल मीडियावर सांगीतले . विशेष म्हणजे मोहन जोशी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आणि त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. Mohan Joshi tests positive for COVID-19 after taking both doses of Vaccine

    याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मोहन यांनीकाही दिवसांपूर्वीच लसीचे दोन्ही डोस घेतले होते.



    मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेत काम करत आहेत . महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मालिकांचं शूटींग बंद करण्यात आलं. त्यानंतर या मालिकेचं शूटींग गोव्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोहन जोशी यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम गोव्यात होती. त्याचवेळी मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली.

    मोहन जोशी यांना कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. सध्या मोहन जोशी गोव्यामध्ये क्वारंटाईन असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र गोव्यातही सध्या लॉकडाऊन लागलं असून मालिकेचं शूटींग बंद आहे.

    Mohan Joshi tests positive for COVID-19 after taking both doses of Vaccine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !