• Download App
    हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या नोकरीतून काढून टाकल्याचे मोदींचे विधान खोटे; संजय राऊत यांचा दावा । Modi's statement that Hridaynath Mangeshkar was fired from All India Radio is false; Sanjay Raut's claim

    हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या नोकरीतून काढून टाकल्याचे मोदींचे विधान खोटे; संजय राऊत यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हृदयनाथ मंगेशकर यांच्या एका मुलाखतीचा हवाला देत राज्यसभेत सांगितले होते. मोदींच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. Modi’s statement that Hridaynath Mangeshkar was fired from All India Radio is false; Sanjay Raut’s claim

    संजय राऊत मी काल संसदेत मुद्दाम बोललो नाही. तिथे वीर सावरकरांचे गीत संगीतबद्ध ह्रदयनाथ मंगेशकरांना त्यांची नोकरी गमवावी लागली, असे मोदींनी सांगितले. पण मला कळायला लागल्यापासून मी ते “सागरा प्राण तळमळला” गाणे आकाशवाणीवरुनच ऐकलेय. हे गाणे आकाशवाणीनेच लोकप्रिय केले आहे. पण माणसाने किती खोटे बोलावे? घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटे बोलू नये. पण मी त्यांना वंदन करतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.



    संजय राऊत म्हणाले, की माझ्या माहितीनुसार असे कुठेही रेकॉर्डमध्ये उपलब्ध नाही. मी ऑल इंडिया रेडिओचे प्रमुख महेश केळुसकर यांचे निवेदन ऐकले. त्यांनाही आश्चर्य वाटले आहे. जर एखादे गाणे निर्माण केल्याबद्दल, गायल्याबद्दल एखाद्या संगीतकाराला काढले असेल तर ते गाणे आकाशवाणीवर लावतील का? आजही मी आकाशवाणी, दूरदर्शन, टीव्हीवर ऐकतो. हे गाणे आमच्या ह्रदयात आहे. मंगेशकर भगिनी आणि ह्रदयनाथ मंगेशकरांनी हे गाणे फार वरती नेऊन ठेवले आहे. आमची सावकरांची भक्ती आहे. आमची नौटकी नाही,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

    नरेंद्र मोदी म्हणाले होते, लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकले. हृदयनाथ मंगेशकर यांनी वीर सावकरांची देशभक्तीपर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकले होते. स्वतः हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत हे सांगितले होते.

    जेव्हा ते सावरकरांना भेटले तेव्हा सावरकरांनी हृदयनाथ यांना माझी कविता सादर करुन जेलमध्ये जायचेय का? अशी विचारले होते. यानंतरही हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेला संगीतबद्ध केले. त्यानंतर आठ दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकले होते. हे तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याच्या या खोट्या गोष्टी तुम्ही देशासमोर ठेवल्या आहेत, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली होती. याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून नवा दावा केला आहे.

    Modi’s statement that Hridaynath Mangeshkar was fired from All India Radio is false; Sanjay Raut’s claim

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!