• Download App
    मोदींच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोनाचे रूग्ण वाढले प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीकाModi's irresponsibility has increased the number of corona patients State Congress President Nana Patole's criticism

    मोदींच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोनाचे रूग्ण वाढले प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. कोणतीही तयारी न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील गरीब, मजूर, कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. Modi’s irresponsibility has increased the number of corona patients State Congress President Nana Patole’s criticism

    यासंदर्भात नाना पटोले म्हणाले ” जगात कोरोनाचे रूग्ण मिळण्यास सुरुवात झाली होती तेव्हा राहुल गांधी उपाययोजना करण्यास सांगत होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नमस्ते ट्रम्प करण्यात व्यस्त होते. आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पंतप्रधानांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाचे रूग्ण वाढले. ”

    पटोले म्हणाले ” कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत. हे अत्यंत दुर्देवी आहे. जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात. ”

    ते म्हणाले की, मोदींच्या गुजरातमध्ये हे उत्तर भारतीय कामगार उपासमारीने त्रस्त असताना महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. आमच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस पक्षाने परप्रांतीय बांधवांची निवासाची जेवणाची व त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. संकटातील लोकांची मदत करण्याचा मानवधर्म आम्ही निभावला.

    Modi’s irresponsibility has increased the number of corona patients State Congress President Nana Patole’s criticism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस