प्रतिनिधी
मुंबई : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलन चालवले असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्या संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मोदींनी स्वतः कुस्तीगीरांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सन्माननीय तोडगा काढावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. हे पत्र राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर देखील ट्विट केले आहे.Modiji, attend to the cries of the wrestlers yourself; Raj Thackeray’s letter to the Prime Minister
या कुस्तीगीरांनी आपल्या मेहनतीने देशाला ऑलिंपिक पदके मिळवून दिली आहेत. त्यामुळे 28 मे रोजी त्यांची जशी फरपट झाली तशी पुन्हा होऊ नये. त्यांचा आक्रोश आपण ऐकून स्वतः लक्ष घालून सन्मानजनक तोडगा काढावा, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
मात्र, राज ठाकरे यांनी ज्यांच्या संदर्भात हे पत्र लिहिले आहे, त्याला वेगळा राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. खासदार ब्रजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातले नेते आहेत. राज ठाकरे यांनी जेव्हा 2022 मध्ये आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती, त्यावेळी याच ब्रशभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही कारण त्यांनी मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहार मधले हिंदी बांधवांना अपमानित करणारी व्यक्तव्य केली होती, असा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या या दौऱ्यावरून भाजप विरुद्ध मनसे असे मोठे राजकारण झाले होते. अखेरीस राज ठाकरे यांनी त्यांचा आयोध्या दौरा स्थगित केला होता.
पण त्यानंतर ब्रजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरे संदर्भातली आपली भूमिका सौम्य केली होती. अयोध्येत त्यांचे स्वागत करायला देखील ते तयार झाले होते. या राजकीय पार्श्वभूमीवर ब्रजभूषण सिंह यांच्या प्रकरणात स्वतः मोदींनी लक्ष घालावे, असे पत्र राज ठाकरे यांनी लिहिले आहे. त्याला वेगळे महत्त्व आहे
Modiji, attend to the cries of the wrestlers yourself; Raj Thackeray’s letter to the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीगीरांचे फक्त दावे, ब्रजभूषण सिंहांच्या विरोधात पुरावेच नाहीत; दिल्ली पोलिसांची माहिती
- तब्बल 53 वर्षांनी निळवंडे धरणाचे पाणी शेतातून खळाळणार!!; शिंदे – फडणवीसांच्या हस्ते चाचणी शुभारंभ
- मान्सूनचा वाढला वेग, उद्या केरळमध्ये पोहोचणार; 15 जूनपासून देशातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता
- संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दावा : सध्याचे संकट काहीच नाही, पाकिस्तानात पुढच्या काही महिन्यांत अन्नाचे दुर्भिक्ष्य आणखी वाढेल