पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घेतलेली आता भेट झाली ती राजकीय तडजोडीसाठी आहे. आम्ही हे करतो पण एकत्र या अशी देवाणघेवाण या भेटीतून होणार आहे. राज्यातले वातावरण बघता आपण एकत्र येऊ आणि लग्न पुन्हा लावून समाजाला शांत करूया असीच भेटीत चर्चा झाली असणार असे सांगत राज्यात पुन्हा सत्तांतर होणार असल्याची शक्यता खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.Modi-Thackeray meeting for political compromise, saying marriage will take place again expressed the possibility of power shift
प्रतिनिधी
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घेतलेली आता भेट झाली ती राजकीय तडजोडीसाठी आहे. आम्ही हे करतो पण एकत्र या अशी देवाणघेवाण या भेटीतून होणार आहे.
राज्यातले वातावरण बघता आपण एकत्र येऊ आणि लग्न पुन्हा लावून समाजाला शांत करूया असीच भेटीत चर्चा झाली असणार असे सांगत राज्यात पुन्हा सत्तांतर होणार असल्याची शक्यता खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली असं सांगतात. परंतु आरक्षणावर आधी अधिवेशन बोलवायचं होते. चर्चा करायची मग पंतप्रधानांना भेटायचं होते. आता भेट झाली ती राजकीय तडजोडीसाठी आहे.
आम्ही हे करतो पण एकत्र या अशी देवाणघेवाण या भेटीतून होणार आहे. राज्यातले वातावरण बघता आपण एकत्र येऊ आणि लग्न पुन्हा लावून समाजाला शांत करूया असीच भेटीत चर्चा झाली असणार नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे कुटुंबाचे संबंध चांगले आहेत.
काही चिंता करायची गरज नाही, हे सरकार ५ वर्ष चालेल. नवीन सत्ता समीकरणाचा विषय नाही. केंद्र सरकारसोबत संवाद वाढतोय तो आणखी वाढत राहावा. केंद्र आणि राज्य सरकारचे चांगले संबंध ही घटनात्मक गरज आहे. राज्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करत राज्यातील सत्तांतरावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. जवळपास एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भलेही राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नाही.
परंतु त्याचा अर्थ आमचं नातं संपलं असा नाही. मी नवाज शरीफ यांना थोडी भेटायला गेलो होतो जे लपून भेटलो. जर मी वैयक्तिक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत असेल तर त्याच चुकीचं काय?
Modi-Thackeray meeting for political compromise, saying marriage will take place again expressed the possibility of power shift
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : मुख्यमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद, पीएम मोदींशी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, वाचा सविस्तर…
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पीएम मोदींकडे केल्या ‘या’ 12 मागण्या, सकारात्मक प्रतिसादाची व्यक्त केली अपेक्षा
- खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द, दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला
- केंद्राच्या अखेरच्या नोटिसीवर ट्विटरने दिले उत्तर, म्हटले- आम्ही भारताप्रति प्रतिबद्ध, सरकारशी बोलणी सुरू
- मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर काँग्रेसचा उडाला गोंधळ; काही नेत्यांनी केले स्वागत, काही नेत्यांनी प्रश्न