विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील काही मंत्री आहेत. त्यांनी काही घोषणा केल्याचे मी ऐकतो आहे. त्यांनी आता पुरग्रस्ताच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेला २ हजार कोटींचा चेक घेऊन यावा.Modi Saheb’s signature Bring a check for Rs 2,000 crore
एखादा, जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यातील पूर परिस्थिती, दौरे आणि मदतकार्य या मुद्यावर संजय राऊत म्हणाले, जगभरात ज्या वेळी अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळी बचावकार्यात अडथळे येऊ नयेत हा नियम आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर अशा काही घटना घडतात तेव्हा शक्यतो आरोप-प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवर आरोप करणे, हल्ले करणे हे थांबले पाहिजे.
महाराष्ट्र आपला आहे, कोकण आपला आहे, सातारा, सांगलीतील माणसे आपली आहेत, प्रत्येकाला असं वाटतंय की आपण मदत करावी. आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा, ही काही श्रेयाची लढाई नाही, हा श्रेयवाद नाही, जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणुसकीशून्य काम करत आहेत.
ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला विशेषतः मुंबई सर्वाधिक कर देते. आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही. पण केंद्र आमचा बाप आहे, महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहे,
त्यांनी काही घोषणा केलेली आहे, त्यांनी येताना दोन हजार कोटीचा चेक घेऊन यावा केंद्राकडून, नरेंद्र मोदी साहेबांची सही असलेला चेक घेऊन यावा एखादा, जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू.
पंतप्रधानपदासाठी उध्दव ठाकरे सक्षम
वाढदिवस साजरा करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते राज्याचे नेतृत्व करत आहेत. मी त्यांना पंचेचाळीस वर्षे ओळखतो आहे. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेतच. मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्राला देखील अपेक्षा आहेत,
हे माझं म्हणणं मी आज पुन्हा अधोरेखित करतो. राष्ट्राला सुद्धा संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज लागली तर ते नेतृत्व करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत आणि ते करतील याची मला खात्री आहे.
- मोदी साहेबांच्या सहीचा २ हजार कोटींची चेक आणा
- एखादा आणला तर वाजत गाजत स्वागत करू
- कोकण, सातारा, सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू
- मदत कार्यात अडथळे कोणीही आणू नयेत
- महाराष्ट्र सरकार जनतेला मदत करण्यास सक्षम
- महाराष्ट्र केंद्राला विशेषतः मुंबई सर्वाधिक कर देते
- पूरग्रस्तांना मदत करणे ही श्रेयाची लढाई नाही
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वत्र लोकप्रिय3
- पंतप्रधानपदासाठी उध्दव ठाकरे सक्षम
Modi Saheb’s signature Bring a check for Rs 2,000 crore