विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर भाई ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रदर्शनाची पाहणी केली. Modi Pune Metro: Inauguration of Pune Metro; In direct Metro, Prime Minister Modi interacts directly with students, not with political leaders !!
मेट्रोतून प्रवास करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रो ॲप द्वारे तिकीट काढले. गरवारे कॉलेज ते आनंदनगर स्टेशन दरम्यान दीड किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी या मेट्रोतून प्रवास केला.
मात्र, यावेळी पंतप्रधानांनी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याशी नव्हे, तर थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काही दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत प्रवास करण्याची संधी देण्यात आली होती. संपूर्ण प्रवासात पंतप्रधान मोदी या विद्यार्थ्यांशीच बोलत होते. या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली.