• Download App
    Modi - Pawar - Pune : मोदींनी भूमिपूजन केलेल्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला पवारांचा "ब्रेक"!!; पण किती काळ शक्य??|Modi - Pawar - Pune: Pawar's "Break" on Mula-Mutha River Improvement Project But for how long?

    Modi – Pawar – Pune : मोदींनी भूमिपूजन केलेल्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला पवारांचा “ब्रेक”!!; पण किती काळ शक्य??

    प्रतिनिधी

    मुंबई : ज्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे, मात्र आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचित केल्याप्रमाणे या नदी सुधार प्रकल्पाला ठाकरे – पवार सरकारने “ब्रेक” लावला आहे. या प्रकल्पाची वर्क ऑर्डर देणे काही काळासाठी स्थगित केले आहे. ही माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.Modi – Pawar – Pune: Pawar’s “Break” on Mula-Mutha River Improvement Project But for how long?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुणे दौऱ्यात मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या आदल्या दिवशी शरद पवारांनी या प्रकल्पाविषयी जाहीर शंका व्यक्त केली होती. त्याचबरोबर या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून पाहण्याची गरज व्यक्त केली होती. पवारांचे हे वक्तव्य महाविकास आघाडी सरकार संबंधित प्रकल्पाला “ब्रेक” लावणार हेच सूचित करत होते.



    त्यानुसार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज पुणे महापालिकेचे अधिकारी आणि काही पर्यावरणवाद्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. येत्या 15 दिवसांत प्रकल्पावरचे कोणते आक्षेप असतील ते मागवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर तज्ञ समितीकडून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    शरद पवारांना एवढा रस का…??

    ज्या नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या नदी सुधार प्रकल्पात शरद पवार यांना एवढा रस का आहे…??, हा खरे तर प्रश्न फार रॉकेट सायन्सचा अभ्यास करून उत्तर देण्यासारखे नाही. किंबहुना पवारांना पुण्यातल्या कोणत्या छोट्या किंवा मोठ्या प्रकल्पांमध्ये “रस” नसतो…??, या खोचक सवाल आत्ताच प्रश्नाचे उत्तर “दडले” आहे. पवार हे पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये “रस” घेतात हा 50 वर्षांचा इतिहास आहे. लवासा प्रकल्प हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याचे पुढे त्याचे काय भाग झाले हा भाग अलहिदा…!!

     मोदींकडून पवारांची दखलही नाही

    आता अशा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यात येतात, पण त्यांचे नावही घेत नाहीत. त्यांच्या आक्षेपांची दखलही घेत नाहीत. यातच “सगळे” आले…!! त्यामुळे यांनी उद्घाटन केलेल्या मेट्रोवर आधीच शरद पवारांनी शरसंधान केले होते आणि आता भूमिपूजन केलेला नदी सुधार प्रकल्प शरद पवार आडवून ठेवणार आहेत. हे उघड गुपित आहे.

    मात्र काही काळ हा प्रकल्प अडवून धरला तरी मूळ प्रकल्प रद्द होऊ शकणार नाही. कारण या विषयीचा अहवाल थेट केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तयार केला आहे. या वस्तुस्थितीकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. “जायका”ने या नदी सुधार प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ही गोष्ट एवढी राज्य सरकारच्याही हातात उरलेली नाही. त्यामुळे काही काळ ब्रेक लावल्याशिवाय ठाकरे – पवार सरकार देखील दुसरे काही करू शकणार नाही. ही शरद पवारांना कितीही कटू वाटली तरी राजकीय वस्तुस्थिती आहे.

    Modi – Pawar – Pune: Pawar’s “Break” on Mula-Mutha River Improvement Project But for how long?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस