प्रतिनिधी
मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करा असे सांगितले होते, पण ईडीने राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या मनसेने आता त्यापुढे जाऊन शरद पवार यांच्या मोदी भेटीवर शरसंधान साधले आहे. Modi – Pawar – MNS: Save my nephew, make money in Delhi; MNS’s support on Pawar’s Modi visit !!
1773 साली “काका मला वाचवा”अश्या आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात”माझ्या पुतण्याला वाचवा”अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या. असे खोचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.
शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपण संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा विषय पंतप्रधानांच्या कानावर घातला. संजय राऊत हे पत्रकार आहेत. राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांच्यावरची कारवाई गरजेची होती का?, असा सवाल पंतप्रधानांना विचारला असे स्पष्ट केले होते.
परंतु मनसेने मात्र शरद पवारांच्या मोदी भेटीचा वेगळाच अर्थ लावला असून त्या भेटीचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याच्या जप्तीशी जोडला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांनी गुरू कमोडिटीच्या नावाखाली अल्प किमतीत विकत घेतला आहे. आधी तो कारखाने दिवाळखोरीत नेला आणि नंतर तो पवारांच्या नातेवाईकांनी विकत घेतला. त्यामुळे ईडीने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा संदर्भ जोडत माझ्या पुतण्याला वाचवा हो, अशा आर्त हाक का दिल्लीत ऐकू आल्या, असे खोचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.
Modi – Pawar – MNS: Save my nephew, make money in Delhi; MNS’s support on Pawar’s Modi visit !!
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल
- अमेरिका, ब्रिटनमध्येही पेट्रोलचे दर ५० टक्यांनी वाढले, भारतातील वाढ केवळ पाच टक्के, पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट
- पतीच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळला, आता आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत
- देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू