Remedivir to Maharashtra : अवघ्या राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्याला अधिकाधिक इंजेक्शन्स पुरवण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा देण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली. Modi Govt Kept its word, maximum supply of Remedivir to Maharashtra, 4 lakh 35 thousand injections for ten days
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अवघ्या राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्याला अधिकाधिक इंजेक्शन्स पुरवण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा देण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटले की, शब्द दिल्याप्रमाणे राज्य सरकारला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वाटा देण्यात आला आहे. रेमडेसिव्हिरच्या 5 लाख उत्पादन वाढीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक 34 टक्के म्हणजेच 1,65,800 इंजेक्शन्स मिळाले आहेत. याबरोबरच 21 ते 30 एप्रिल 2021 या दिवसांच्या काळासाठी राज्याला एकूण 4,35,000 इंजेक्शन्स मिळाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ हजार २१८ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, आता राज्यनिहाय रेमडेसिव्हिर वाटपाची सुधारित यादी प्रसिद्ध झाली असून त्यातही राज्याला देशात सर्वाधिक इंजेक्शन मिळाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन महाराष्ट्रासह कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह १९ राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरविण्याचे आदेश दिले आहे. यानंतर यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न करून रेमडेसिवीरचा पुरवठा प्रचंड वेगाने वाढवण्याला.
दि. 21 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या दहा दिवसांकरिता देशभरात वाटपासाठी एकूण 16 लाख इंजेक्शनचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्राला 4,35,000 इंजेक्शनचा कोटा देण्यात आला आहे. महाराष्ट्रा खालोखाल गुजरातला 1,65,000, उत्तर प्रदेशला 1,61,000 तर कर्नाटकाला 1,22,000 इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे.
Modi Govt Kept its word, maximum supply of Remedivir to Maharashtra, 4 lakh 35 thousand injections for ten days
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! दारूची तल्लफ जिवावर उठली, सॅनिटायझर प्यायल्याने यवतमाळमध्ये 7 मजुरांचा मृत्यू
- जबरदस्त : कोव्हॅक्सिन खऱ्या अर्थाने बनले स्वदेशी, कच्च्या मालासाठी अमेरिकीची गरज नाही, उत्पादनही वार्षिक 70 कोटी डोस जगात सर्वाधिक
- 22 मंत्र्यांनी तक्रार करूनही दखल नाहीच, डॉ. व्यास यांना कुणाचे अभय?, आरोग्यमंत्री टोपेंनीही टेकले हात, खात्याचा सचिवही बदलता येईना
- लसीच्या दरांबद्दलच्या सर्व शंका केंद्र सरकारने केल्या दूर, 150 रुपयांत लस घेऊन राज्यांना पुढेही मोफतच देणार
- Delhi Oxygen Crisis : ऑक्सिजनअभावी दिल्लीत 20 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा जास्त रुग्णाचा जीव टांगणीला