• Download App
    MNS to launch 'Samudra Kimara Swachhta Mohim' on December 11 across Maharashtra; Amit Thackeray appeals to participate in the campaign

    ११ डिसेंबरला मनसे महाराष्ट्रभर राबवणार ‘समुद्र किमारा स्वच्छता मोहीम’ ; अमित ठाकरेंनी केल मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन

     

    ही मोहीम महाराष्ट्रातील ४० समुद्र किनाऱ्यांवर येत्या ११ डिसें.पासून रोजी स.१० ते दुपारी १ वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे.MNS to launch ‘Samudra Kimara Swachhta Mohim’ on December 11 across Maharashtra; Amit Thackeray appeals to participate in the campaign


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या कालावधीत मनसेद्वारे महराष्ट्रात ‘समुद्र किमारा स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येणार मनसे नेते अमित ठाकरे यांनी यांनी व्हिडीओ शेअर करत मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

    अमित ठाकरे यांनी या ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ संदर्भात व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये ते म्हणाले आहेत की,’मी आज तुमच्यासमोर माझ्या मनाच्या जवळचा एक मुद्दा घेऊन येत आहे. ते म्हणजे, आपले समुद्र किनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे ७२० किलोमीटर लांबी असलेल्या समुद्र किनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, असं मला वाटतं.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्या महाराष्ट्रात राबवणार आहे.

    पुढे ते म्हणाले की , ही मोहीम महाराष्ट्रातील ४० समुद्र किनाऱ्यांवर येत्या ११ डिसें.पासून रोजी स.१० ते दुपारी १ वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे. जर आपल्या जवळचे समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहीमेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. आपल्या सर्वांच्या मेहनतीनं हे समुद्र किनारे स्वच्छ होतील, याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.’

    MNS to launch ‘Samudra Kimara Swachhta Mohim’ on December 11 across Maharashtra; Amit Thackeray appeals to participate in the campaign

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस