प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा पुन्हा एकदा सुरू केल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेतच, पण मनसेचे नुकतेच हल्ला झालेले नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून या चर्चेची खिल्ली उडवली आहे.MNS leader sandeep deshpande pinched Uddhav Thackeray over his prime ministerial ambitions
मज्जा आहे बाबा एकाची. आता ते पंतप्रधान होणार त्यांच्याशी हिंदीतच बोलले पाहिजे. भंकस वाटली का? बुरा ना मानो होली है अशा आशयाचे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे हे पंतप्रधान चेहरा असू शकतात का?, असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावेळी त्यांनी ते स्पष्टपणे न नाकारता असे भाकीत करणे अवघड आहे. 2024 पर्यंत काहीही होऊ शकते. पण उद्धव ठाकरे हा पंतप्रधानपदासाठी विरोधकांचा उत्तम चेहरा आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाच्या दाव्याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरू झाली आणि आज धुळवळीच्या दिवशी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भावी पंतप्रधान पदाची भंकस वाटली का? बुरा न मानो होली है, अशा शब्दांमध्ये खिल्ली उडवली.
MNS leader sandeep deshpande pinched Uddhav Thackeray over his prime ministerial ambitions
महत्वाच्या बातम्या
- PMPML महिलांना घडवणार दर महिन्याचा 8 तारखेला मोफत प्रवास
- केनियामध्ये ड्रॅगनला विरोध : चिनी व्यावसायिकांविरोधात रस्त्यावर उरतली जनता, चायनीज मस्ट गोच्या घोषणा
- गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत
- नागालँड-मेघालयात आज शपथविधी सोहळा : कॉनरॅड संगमा-नेफियू रिओ पुन्हा घेणार पदभार, PM मोदी-अमित शहांची उपस्थिती