• Download App
    जलील आणि त्याची टोळी म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड – बाळा नांदगावकरांचे टीकास्र! MNS leader Bala Nandgaonkar criticizes MIM MP Imtiaz Jalil

    जलील आणि त्याची टोळी म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड – बाळा नांदगावकरांचे टीकास्र!

    जरा “योगी स्टाईल” ने कडक धडा शिकवावा, त्याशिवाय हे सुधारणार नाहीत. अशी मागणीही सरकारकडे केली आहे.

    प्रतिनिधी

    एमआयमएचे खासदार  इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवत साखळी उपोषण सुरू केलं आहे. शिवाय जलील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही विधान केलं आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा आणि शिंदे गटाकडून जलील यांना लक्ष्य केलं जात असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. MNS leader Bala Nandgaonkar criticizes MIM MP Imtiaz Jalil

    ‘’छत्रपती संभाजीराजे नावाला विरोध करणारा जलील आणि त्याची टोळी म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. याने नुकताच बाळासाहेबांचा देखील अपमान केला. जलीलचा मराठीत अर्थ अपमान, खरच शोभून नाव भेटले तुला जलील. जो स्वतः जलील आहे तो विचारतो की बाळासाहेब कोण होते? तु आणि तुझे “2भुरटे मालक” असं नांदगावकर ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.


    …होय भारत सोने की चिडीया! मोदी सरकारच्या काळात देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लागतोय नव्याने शोध


    याशिवाय ’’एक लक्षात ठेवायचं हा महाराष्ट्र आहे इथे सब कुछ आमचे छत्रपती. नीट राहायचे, मोगलांचे कौतुक असेल तर तुझ्या हैदराबादला निघायचं. तसेच सरकारला विनंती आहे की ज्यांनी त्या औरंगजेबचे फोटो झळकावले त्यांना नुसते गुन्हे दाखल करून अटक करून नव्हे तर जरा “योगी स्टाईल” ने कडक धडा शिकवावा, त्याशिवाय हे सुधारणार नाहीत.’’ असंही नांदगावकरांनी म्हटलं आहे.

    खासदार जलील बाळासाहेब ठाकरेंबद्दल नेमक काय म्हणाले?

    एका व्हिडीओमध्ये खासदार इम्तियाज जलील औरंगाबादच्या नामांतरावरून सरकारवर टीका करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. “बाळासाहेब ठाकरे कोण होते? ते असे कोण होते की ज्यांचं स्वप्नं पूर्ण झालं आहे असं बोलंल जातय? भारतात काही मोजके लोक असे होते ज्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती, हे त्यांच्यातले होते. ज्यांना निवडणूक आयोगाने म्हटले होत की सहा वर्षं तुम्ही मत देऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे असे काही फार मोठे नव्हते की ज्यांचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल. परंतु यांच्याच खालच्या दर्जाच्या राजकारणामुळे तुम्हाला माझ्या शहराचं नाव बदलण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवाल इम्तियाज जलील विचारताना या व्हिडीओत दिसत आहेत.

    MNS leader Bala Nandgaonkar criticizes MIM MP Imtiaz Jalil

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!