विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेचे एकच ‘नवनिर्माण’ … ‘मराठी ते हिंदीचा प्रवास’… असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. मनसेची उत्तरसभा ठाण्यात आज होत असून काही दिवसापूर्वी मनसेच्या शिलेदारांनी राज ठाकरे यांच्या सभेचा एक हिंदी ‘टीझर’ रिलीज केला होता आणि आज पदाधिकार्यांनी हिंदीमध्ये बॅनर लावल्याने क्लाईड क्रास्टो यांनी त्यांना फटकारले आहे. MNS ‘Journey from Marathi to Hindi’Criticism of Clyde Crusto
भाजप नेत्याने “हिंदी को इंग्लिश के एक विकल्प के तौर पर लिया जाना चाहिए”, असे सांगितले होते. या वाक्याचे मनसेकडून निष्ठेने तंतोतंत पालन केले जात अशी खोचक टिकाही क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
मनसेकडून हिंदीचे अनुकरण होत असल्याने राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेत उत्तर प्रदेश, बिहारी लोक येण्याची शक्यता क्लाईड क्रास्टो यांनी व्यक्त केली आहे.