प्रतिनिधी
ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर आणि देशभरात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन उभे केले. त्या आंदोलनाचा जोरदार परिणाम उत्तर प्रदेशात दिसला आहेच. पण आता तो महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. ठाण्यातील मुंब्रा आणि कापूरबावडी परिसरातील मशिदींवरील भोंगे मशिदीच्या मौलवींनी खाली उतरवले आहेत. हा मनसेच्या आंदोलनाचा इफेक्ट आहे, असे बोलले जात आहे. MNS effect; The horns were lowered on the mosques at Mumbra, Kapurbawdi
– भोंगा विरोधी आंदोलनाचा परिणाम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेत पहिल्यांदा मशिदींवरील भोंगे खाली उतरावा अन्यथा मशिदींसमोर दुप्पट भोंगे लावून त्यावरून हनुमान चालीसा लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद येथील सभेतही राज ठाकरे यांनी पुन्हा तीच भूमिका घेत ४ मे रोजी ठिकठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचा आदेश दिला होता.
– मनसेची आंदोलनातून माघार नाही
त्यानुसार बुधवार, ४ मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी भोंगे लावून हनुमान चालीसा लावले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेचे भोंगे आंदोलन हे केवळ एक दिवसाचे नाही तर दररोज सुरु असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ठाण्यातील मुंब्रा आणि कापूरबावडी येथील मशिदींवरील भोंगे मशिदीच्याच मौलवींनी खाली उतरवले आहेत. हा मनसेच्या भोंगा आंदोलनाचा परिणाम आहे, असे मानले जात आहेत.
MNS effect; The horns were lowered on the mosques at Mumbra, Kapurbawdi
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : स्वागताचा मराठमोळा उत्साह; पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…??!!
- चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोर सुरू झाली पॉर्न फिल्म, इंडियन ऑईलला दाखवायचा होता पायलट प्रोजेक्ट
- Raj Thackeray : ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन
- पोलीसांनी राज ठाकरे यांना बजावली नोटीस, कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा