प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्रामध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची नाही. त्यामुळेच केंद्राने मोजायचे? की राज्याने ज्याने मोजायचे? यावरून ओबीसी आरक्षणाच्या घोळ घातला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.MNS chief Raj Thackeray hit out at MVA government over OBC issue
राज ठाकरे आज औरंगाबाद मध्ये आहेत. त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. ही बैठक महापालिका निवडणुकीसाठी नसून पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाचा गोळ महाविकास आघाडीचे सरकार का घालत आहे, याचा त्यांनी खुलासा केला. महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची कोणाची तयारी नाही. त्यामुळे मूळ मुद्द्यावरून बाजू लक्ष बाजूला हटवण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा घोळ घातला जातो आहे. एम्पिरिकल डाटा देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद आहेत. ओबीसी केंद्राने मोजायचे? की राज्याने मोजायचे?, असा घोळ ते घालत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून!!; राज ठाकरेंना पहिली पत्रिका पाटलांकडून!!
महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने स्थानिक पातळीवर ओबीसींच्या संख्येचा अभ्यास न करता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यामुळे त्याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातले ओबीसींचे 27 टक्के आरक्षण स्थगित केले. हा मूळ मुद्दा निवडणुकीशी संबंधित आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी नाही म्हणूनच ते घोळ घालत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
देशातून पाच लाख उद्योजक बाहेर पडले. या बातमीवर कोणाचेही लक्ष नाही. त्याचा रोजगारावर किती प्रतिकूल परिणाम झाला आहे हे कुणालाही माहीत नाही. या बातम्या प्रसार माध्यमे चालवत नाहीत. आर्यन खानच्या बातम्या चालवण्यात त्यांना रस आहे, असा टोलाही राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना लगावला आहे.