• Download App
    सरकार झोपलेय का, सवाल करीत अमित ठाकरेंची सप्नील लोणकरच्या परिवाराला मदत MNS amit thackeray supoorts swapnil lonkar family

    सरकार झोपलेय का, सवाल करीत अमित ठाकरेंची स्वप्निल लोणकरच्या परिवाराला मदत

    प्रतिनिधी

    पुणे – महाराष्ट्रात विद्यार्थी आत्महत्या झाल्यात पण राज्यातले ठाकरे – पवार सरकार झोपलेय का, असा खडा सवाल राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज केला. MNS amit thackeray supoorts swapnil lonkar family

    एमपीएससी पास झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांत्वनपर भेट घेऊन स्वप्नीलच्या आई वडिलांना दोन लाखांचा चेक दिला. त्याचवेळी अमित ठाकरे यांनी त्यांचा मोबाईल नंबर देऊन कुटुंबीयांना आणखी मदतीचे आश्वासनही दिले. कधीही काही वाटले आणि काही मदत लागली तर फोन करा. आमचा संपूर्ण पक्ष तुमच्याशी पाठीशी आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी ठाकरे – पवार सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, की एवढ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्यात. पण हे सरकार झोपलेय का? हे विचारले पाहिजे. सरकारने लवकरात लवकर नोकर भरती केली पाहिजे, अशी मागणीही अमित ठाकरे यांनी केली आहे.

    नुसते भेटून कसे प्रश्न सुटतील…

    दुसरीकडे अशा भेटी देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही. भरती लवकर करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी लागू द्या हीच आमच्या स्वप्नीलसाठी श्रद्धांजली आहे अशी प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईवडिलांनी व्यक्त केली आहे.

    आशा भेटी देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही आहेत. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर आता आयुष्यभर आम्हाला रडतखडत जगावं लागेल. आम्हाला भेटण्यापेक्षा भरती करा, आणि विद्यार्थ्यांना नोकरी द्या. आम्हाला आमचा मुलगा नोकरीला लागला असं वाटेल. आमच्या मुलांचे बलिदान झालेय, त्यामुळे आता सगळ्यांना जाग तरी यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    MNS amit thackeray supoorts swapnil lonkar family

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!