• Download App
    दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्यावरून आमदार सदाभाऊ खोतयांनी राज्य शासनावर ओढले ताशेरे , म्हणाले ....MLA Sadabhau Khot slammed the state government for putting up shop signs in Marathi, saying ....

    दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनावर ओढले ताशेरे , म्हणाले ….

    याआधी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.MLA Sadabhau Khot slammed the state government for putting up shop signs in Marathi, saying ….


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले असून, 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने, आस्थापनांनाही ही मराठी पाट्यांची सक्ती लागू करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला.या पाट्यांवर मराठीतील म्हणजे देवनागरी लिपीतील अक्षरे इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत.



    दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर राजकिय वर्तुळात टिका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे.आज रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोतयांनी राज्य शासनावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन हल्लाबोल केला आहे.याआधी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.

    सदाभाऊ खोत म्हणाले की, “अहो दुकानावर मराठी पाट्या हव्यात पण मराठी शाळा नको! ह्याच सरकारनं प्राथमिक शिक्षण मराठीतून घेतलं म्हणून मराठी शिक्षक उमेदवारांना अपात्र ठरवलं.मराठीची पोकळ कळकळ जरा समजून घ्याच! हे मराठीचं दुटप्पी राजकारण आहे.अशी बोचरी टीका सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर केली आहे.

    MLA Sadabhau Khot slammed the state government for putting up shop signs in Marathi, saying ….

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !