प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेवर नेमका हक्क कुणाचा??, हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. या बाबतचे प्रकरण हे सध्या सुप्रीम कोर्टातील केस प्रलंबित असून यावरील सुनावणीला तारखांवर तारखा मिळत आहेत. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. MLA Bharat Gogawle spoke about the Supreme Court
या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टात पुढची पाच वर्षे तरी लागणार नसल्याचे गोगावले यांनी म्हटले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण याबाबत शिंदे सरकारचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्र्यांची सूचना
आमचे प्रतोद भरत गोगावले यांनी जाहीर सभेत भाषण करताना बोलण्याच्या ओघात चुकीचे विधान केले. ज्यावेळी एखाद्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असते तेव्हा त्याबाबत कोणतेही वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळेच न्यायालयातील प्रकरणावर कोणत्याही आमदाराने किंवा पदाधिकाऱ्यांनी वक्तव्य करू नये, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.
विलंबाबाबत आमची तक्रार नाही
ही पक्षाची भूमिका नसून गोगावले यांच्याकडून अनावधानाने हे विधान करण्यात आले आहे. या प्रकरणावर सुनावणी होण्यासाठी जो विलंब होत आहे त्याबाबतही आमचे काही म्हणणे नाही. न्यायालय योग्य पद्धतीने काम करत असते त्यामुळे या विषयावर आम्हाला काहीही बोलायचे नसून आमच्यासाठी हा विषय संपला असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
MLA Bharat Gogawle spoke about the Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- शिंदेसेनेने बदलला पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता : यशवंत जाधवांची पक्षाचे मुंबई अध्यक्ष, नवा पत्ता ठाण्याचा
- सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 5 न्यायाधीशांचे घटनापीठ घेणार निर्णय
- काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला, गरज भासल्यास १९ ला मतमोजणी आणि निकाल
- Sonali Phogat : सोनाली फोगट हत्येप्रकरणी पाचवी अटक, हे चारही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात