मिशन कवच कुंडल नावाने एक योजना उद्यापासून सुरू होत आहे.८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ही योजना राबवायची आहे.Mission kavach kundal: Health Minister Rajesh Tope’s announcement; What is Mission kavach kundal ? Learn the details
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : करोनाच्या रुग्णवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आलेलं आहे. मात्र, अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका आहे.राज्यात आजपासून मंदिरे पुन्हा उघडण्यात आली आहेत. तर दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या. राज्यात लसीकरण सुद्धा मोठ्या वेगाने सुरू आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्याप टळलेला नाहीये.त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असून जास्तीत जास्त वेळेत लसीकरण पूर्ण करणे गरजेचं आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत ‘मिशन कवच कुंडल’ योजनेची घोषणा केली आहे.
नेमकी काय आहे मिशन कवच कुंडल योजना
मिशन कवच कुंडल नावाने एक योजना आम्ही उद्यापासून सुरू होत आहे.८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ही योजना राबवायची आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे की, देशात १५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत १०० कोटी नागरिकांचं लसीकरण व्हावं असं केंद्र सरकारचं टार्गेट आहे.
रोज किमान १५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य
मिशन कवच कुंडल योजना ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत राबवणार आहोत. रोज किमान १५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य आपण ठेवलं आहे. पूर्वी लस उपलब्ध नसायची तशी परिस्थिती आता नाही. या क्षणाला ७५ लाख लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत. २५ लाख आज उपलब्ध होतील. त्यामुळे १५ लाख लसीकरण रोज केलं तर ६ दिवसांत हा स्टॉक पूर्णपणे संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.
३ कोटी नागरिकांचे लसीकरणाचे उदिष्ट
पुढे राजेश टोपे म्हणाले की , महाराष्ट्रात सध्या ९ कोटी १५ लाख लोकांचे लसीकरणाचे उदिष्ट आहे. पहिला डोस ६ कोटी लोकांनी घेतला आहे. आणखी ३ कोटी नागरिकांचे लसीकरणाचे उदिष्ट आहे. राज्यात १८ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी कोरोनाची लस दिली गेली, तर त्यांनाही एंटीबॉडिज संरक्षण मिळू शकेल. सेकंड डोस हे अडीच कोटी इतक्या प्रमाणात देण्यात आले आहेत.
पहिल्या डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ६५ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३० टक्के आहे. पण अजुनही सव्वा तीन कोटी लोकांना डोस द्यायचा आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठीची भीती कमी होण्यासाठी मदत होईल. राज्यात ६५ टक्के डोस झाल्याने निर्बंध हे आता १०० टक्के हटविण्यात आले आहेत. तसेचदसरा, दिवाळी हिंदु धर्मातील मोठा सण आहे. त्यानंतर कोरोना वाढेल का याबाबत शंका व्यक्त केली जातेय. असेही टोपे म्हणाले.
Mission kavach kundal: Health Minister Rajesh Tope’s announcement; What is Mission kavach kundal? Learn the details
महत्त्वाच्या बातम्या
- चीनची पाकिस्तानला भारताविरुद्ध कारवायांसाठी चिथावणी; लष्करी प्रशिक्षणापासून आधुनिक ड्रोनपर्यंत सर्व पुरवठा
- अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी कोल्हापुरात पूजाअर्चा करून आकर्षक सजावट
- ED Raid : अजित पवारांच्या अडचणीत वाढ! ईडीचा थेट निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर छापा
- जम्मू -काश्मिरात दहशतवाद्यांचा सामान्य नागरिकांवर भ्याड हल्ला, गोळीबारात दोन शिक्षकांचा मृत्यू, अनेक जण जखमी