विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरीब, मध्यमवर्गीय, कामगार व युवकांचा भ्रमनिरास करणारा आणि दिशाहिन असा आहे. कोरोनामुळे आधीच विविध आघात सहन करीत असलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.Misleading directionless budgetCriticism of Pune City NCP
मात्र, यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून विश्वासघातच पदरी पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
देशातील मध्यमवर्गीयांची वाढती संख्या पाहता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून या अपेक्षाची पूर्तता व्हायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही. करामधील स्लॅब हा पाच-सात वर्षांपूर्वी निश्चित झालेला आहे. या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यातच कोरोनामुळे सामान्य जनतेचे आणि विविध क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत दिलासा देणे हे सरकारचे काम असताना, जनतेशी काहीही देणेघेणे नसलेल्या सरकारने त्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
Misleading directionless budgetCriticism of Pune City NCP
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण्यांची खुशामतखोरी कशाला? खाम नदी प्रकल्पाला माझे नाव नको… भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी औरंगाबाद आयुक्तांना लिहिले खरमरीत पत्र
- निर्मला सीतारामन यांच्या परखड प्रत्युत्तरानंतर काँग्रेसने चिदंबरम यांना उतरवले बजेटच्या मैदानात!!
- Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेले डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?, काय-काय होणार फायदे? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
- Budget 2022 : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार आणणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी, काय होणार फायदे? वाचा सविस्तर…