विशेष प्रतिनिधी
सांगली : अफझलखान वधाच्या पोस्टरवरून मिरज शहरामध्ये २००९ दरम्यान जातीय दंगली झाली होती. या प्रकरणातील १०६ जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तेव्हा गणेशोत्सवा दरम्यान ही जातीय दंगल झाली होती. Miraj riots case over Afzal Khan assassination poster withdrawn by Thackeray-Pawar government; 106 acquitted by court
मिरज दंगलीचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटले होते. ठाकरे- पवार सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हा खटला निकाली काढत न्यायालयाने १०६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरामध्ये अफजलखान वधाचे पोस्टर उभारले होते. त्यावर लिहिलेल्या विधानानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस शहर दंगलीत धगधगत होते. याचे पडसाद सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते. मिरज-सांगलीमध्ये पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या १०६ जणांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले होते.
सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरू होता.दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त केला. तसेच १०६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी दिली.
दंगली प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यावरदेखील गुन्हे दाखल झाले होते. मात्र, २०१७ मध्ये तत्कालीन युती सरकारकडून हे गुन्हे मागे घेत चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, भाजपचे सरचिटणीस मकरंद देशपांडे यांची निर्दोष मुक्तता केली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरज दंगलीचे पडसाद उमटले होते. सर्वाधिक परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता. दंगलीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीय ध्रुवीकरण होऊन अनेक प्रस्थापित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा पराभव झाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५ ते ६ विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत शिवसेना आणि भाजपचे उमेदवार जिंकून आले होते.
Miraj riots case over Afzal Khan assassination poster withdrawn by Thackeray-Pawar government; 106 acquitted by court
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना असतानाही भारतीय लष्कराने सीमेवरील आव्हान परतवून लावले, जनरल मनोज नरवणे यांचे प्रतिपादन
- नवज्योत सिंग सिध्दू कुठूनही लढणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही, कॅ. अमरिंदर सिंग यांचा इशारा
- बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिला हवाई दल अधिकाऱ्याची केली कौमार्य चाचणी, चेन्नई येथील प्रकार
- महामार्ग कसे अडवता म्हणत दिल्लील आंदोलक शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले