social and economic survey of NT and VJNT : राज्यातील भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण लवकरच करून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. Minister Vijay Vadettiwar says To conduct social and economic survey of NT and VJNT based on independent population
वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण लवकरच करून या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
मंत्रालयातील परिषद सभागृह येथे भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यातील सदस्यांची बैठक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वडेट्टीवार म्हणाले की, भटके विमुक्त जाती- जमातीचे अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये या समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण घरोघरी जाऊन होणे गरजेचे आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देशित केलेल्या सूचनांनुसार घरोघरी जाऊन सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण होण्याबाबत राज्यांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर मागासवर्ग विभागाने कार्यवाही करून घ्यावी. देशात राजस्थान व हरियाणा या राज्यांनी लोकसंख्येवर आधारित असे सर्वेक्षण केले आहे. याची माहिती विभागाने घेऊन या सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या बाबींचा अंदाजपत्रकात समावेश करून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवून या विभागाने निधी उपलब्ध करून घ्यावा, अशा सूचनाही वडेट्टीवार यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाला दिल्या.
वडेट्टीवार म्हणाले, या समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोक एका ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे जातीचा दाखला मिळत नाही त्यामुळे यापुर्वी सामाजिक न्याय विभागाकडून काढण्यात आलेला २००८ चा शासन निर्णय हा अत्यंत योग्य होता या शासन निर्णयाबाबत सकारात्मक निर्णय घेवून हा शासन निर्णय पुनर्जिवीत करणार असल्याची ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, भटके विमुक्त समाजातून होणाऱ्या शासकीय नोकरभरतीमध्ये अ, ब, क व ड या प्रवर्गाची भरती न्याय्य पद्धतीने होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. लोककलावंताबाबतही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार या समाजातील कलावतांसाठी एक संमेलन घेण्यात येईल. भटके-विमुक्त हक्क परिषदेमार्फत याबाबत प्रस्ताव सादर करावा. हे संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. वि.जा.भ.ज. व इ.मा.वि.मा.प्र. कल्याण विभागामध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात येत असून त्याबाबत आवश्यक असणारी पदे मंजूर आहेत.
यावेळी भटके-विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे व इतर सदस्य यांनी भटके-विमुक्त समाजाची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक सद्य:स्थिती जाणून घेवून शासकीय स्तरावर योजना आखल्या जाव्यात व त्या प्रभावीपणे राबवाव्यात, लोकसंख्येच्या आधारावर या समाजाच्या विकास योजनांसाठी निधीची तरतूद करणे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाला निधी वाढवून देण्यात यावा व भटके-विमुक्तांतील नाका कामगारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना मांडल्या.
Minister Vijay Vadettiwar says To conduct a social and economic survey of NT and VJNT based on independent population
महत्त्वाच्या बातम्या
- ITI साठी प्रवेशप्रक्रिया सुरू : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध, नवाब मलिक यांची माहिती
- West Bengal Violence : NHRC ने रिपोर्टमध्ये म्हटले- रेप आणि हत्येच्या प्रकरणांची CBI चौकशी व्हावी, राज्याच्या बाहेर चालावेत खटले
- GST Compensation : जीएसटी नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी रुपये वितरीत, महाराष्ट्राला 6501.11 कोटी
- मुंबईतील उद्यानाला टिपू सुलतानच्या नावामुळे वादाची ठिणगी, सपा नगरसेविकेविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा
- सैन्याला भाजीपाला पुरवणाराच निघाला ISI चा हेर, चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता