• Download App
    मंत्री राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादीचीच केली कोंडी, म्हणाले, 'भाजपनं मागवलेलं रेमडेसिव्हिर राज्य सरकारलाच मिळणार होतं' । Minister Rajendra Shingane says, BJP buy Remedesivir Injections For state government

    मंत्री राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादीचीच केली कोंडी, म्हणाले, ‘भाजपनं मागवलेलं रेमडेसिव्हिर राज्य सरकारलाच मिळणार होतं’

    Minister Rajendra Shingane : राज्यात कोरोनाच्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून राजकीय वाद उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपने रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रीतसर परवानगी घेतली होती. भाजपने मागवलेला रेमडेसिव्हिरचा इंजेक्शनचा साठा हा राज्य सरकारलाच मिळणार होता, असा दुजोरा औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दिला. यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीला शिंगणेंकडून घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे. Minister Rajendra Shingane says, BJP buy Remedesivir Injections For state government


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून राजकीय वाद उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपने रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रीतसर परवानगी घेतली होती. भाजपने मागवलेला रेमडेसिव्हिरचा इंजेक्शनचा साठा हा राज्य सरकारलाच मिळणार होता, असा दुजोरा औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दिला. यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीला शिंगणेंकडून घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे.

    नुकतेच आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महाराष्ट्राला जाणूनबुजून रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात येत नसल्याचा आरोप केला होता. हे इंजेक्शन महाराष्ट्राला दिल्यास उत्पादक कंपन्यांना केंद्राने लायसन्स रद्द करण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपांचा केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी समाचार घेत मलिकांना वास्तव परिस्थितीची माहितीच नसल्याचे स्पष्ट केले होते.

    एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या संपूर्ण राजकारणावर भाष्य करताना म्हणाले की, मागच्या आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मला भेटले. त्यांनी यावेळी निवेदन दिलं होतं. निर्यातदारांकडे जो साठा होता तो संकटकाळात राज्याला मिळू शकत असल्याचे यावरून दिसले. यामुळे स्वच्छ हेतूने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने त्यांना परवानग्या दिल्या. त्यानंतर कंपन्या त्यांच्याकडील साठा राज्य सरकारलाच देऊ शकत होते, इतर कोणालाही देऊ शकत नव्हते. पण मधल्या काळात ज्या घडामोडी त्यात वेगळं राजकारण झालं. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. पण महामारीचा मुकाबला करण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवा, असं वक्तव्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. यामुळे मंत्री शिंगणे यांनी भाजपवर बेछूट आरोप करणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांचीच कोंडी केल्याचं बोललं जात आहे.

    डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, रेमडेसिव्हिरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय ही वस्तुस्थिती आहे. परंतु 21 तारखेनंतर पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू होईल. सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्याबाबतचे संकेत पाळले जात नाही. दुर्देवाने खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणं असली तरी रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातंय. रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही त्याची मागणी होत आहे. काही रेमडेसिवीर कंपन्यांनी मे महिन्यात पुरवठा करू, असं सांगितलं आहे. जास्तीत जास्त पुरवठा रेमडेसिवीरचा व्हायला हवा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

    सरकारला मिळवता येत नाही त्याला भाजप दोषी कसा? – प्रवीण दरेकर

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मी आणि आमदार प्रसाद लाड दोघे दमणला गेलो, तेथील ब्रूक फार्मा कंपनीशी चर्चा केली. त्यांच्याकडील निर्यात साठा महाराष्ट्राला मिळेल यासाठी प्रयत्न केले. खरे तर निर्यात साठा राज्याला मिळवून देण्याचे काम भाजपने केले. आम्ही मुख्य सचिव सीताराम कुंटे, मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोललो. देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्र्यांशी बोलले. त्यानंतर राज्याने निर्यात साठा विक्री करण्यास संमती दिली. आता ब्रुक कंपनीचा रेमडेसिविरचा साठा राज्य सरकारला मिळवता येत नाही, त्याला भाजपचा दोष कसा? हा साठा मिळवण्यासाठी सरकार काही प्रयत्न करत नाही. सरकारचा अंतस्थ हेतू वेगळा आहे. उलट ब्रुक कंपनी व आम्हाला सरकार साठेबाज म्हणत आहे. आम्ही 50,000 रेमडेसिवीरच्या कुप्या राज्य सरकारलाच देणार होतो. यात चूक काय आहे? आजही आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेवटी नागरिकांचे प्राण वाचणे महत्त्वाचे आहे, असा स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

    Minister Rajendra Shingane says, BJP buy Remedesivir Injections For state government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य