• Download App
    पत्नीच्या वैद्यकीय उपचारासठी दुग्ध व्यवसायाकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार|Milk dairy businessman attempt to murder by his worker because he was not give him advance sallery

    पत्नीच्या वैद्यकीय उपचारासठी दुग्ध व्यवसायाकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार

    दुग्ध व्यवसायीकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार करत जबरी चोरी केल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. हा प्रकार संबंधीत व्यवसायीकाच्या कामगारानेच मित्रांसोबत मिळून केला होता. त्याच्या पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी व्यवसायीकाने पगाराची रक्कम आगाऊ न दिल्याने त्याने हे कृत्य केले.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे-दुग्ध व्यवसायीकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार करत जबरी चोरी केल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. हा प्रकार संबंधीत व्यवसायीकाच्या कामगारानेच मित्रांसोबत मिळून केला होता. त्याच्या पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी व्यवसायीकाने पगाराची रक्कम आगाऊ न दिल्याने त्याने हे कृत्य केले. संबंधीत कर्मचाऱ्याला त्याच्या साथीदारांसह कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.Milk dairy businessman attempt to murder by his worker because he was not give him advance sallery

    आकाश सुर्यकांत पवार ( रा. वेताळवस्ती, कॅनॉल लगत, सासवडरोड,हडपसर ), मयुर उत्तम कांबळे (21 धंदा भाजी विक्री, रा. बाप्पू हिंगणे चाळ, हडपसर गाव ), अविनाश नागनाथ सुर्यवंशी (22 धंदा मजुरी, रा. हिंगणे मळा, हडपसर गाव ) आदित्य सतीश कोरडे (20 धंदा नोकरी, रा. गोंधळेनगर, हडपसर ) अशी आरोपींची नावे आहेत.



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पांडुरंग सदाशिवी कुरणे ( श्रीया प्लाझा, गणपती माथा मंदिर समोर वारजे माळवाडी) यांचा दुध डेअरीचा व्यवसाय आहे. ते 14 मार्च रोजी दिवसभराची व्यवसायाची 10 हजार रोख रक्कम व लॅपटॉप त्यांच्या बॅंगमध्ये घेवून त्यांच्या दुचाकी वरून जात होते.

    उंड्री पुणे येथील प्रिन्स टाऊन रॉयल सोसायटीचे समोर मोकळ्या जागेत ते लघुशंके करीता थांबले असता अनोळखी तीन असमांनी फिर्यादी यांना कोयत्याने मारून जखमी करून त्यांच्याकडील लॅपटॉप 10 हजार रोख रक्कम, पॅनकार्ड, आधारकार्ड व बॅंकेची इतर कागदपत्रे बळजबरी घेवून त्यांच्या दुचाकी गाडीवरून पळून गेले होते.

    याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर त तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला. दरम्यान अंमलदार किशोर वळे, पोलीस निलेश देसाई यांनी माहिती मिळाली की कुरणे यांच्याकडे आकाश सुर्यकांत पवार हा नोकरीस होता. त्याने पत्नीच्या उपचाराकरीता आगाऊ पगार मागितला होता.

    परंतू फिर्यादी यांनी त्यास नकार दिला होता. त्याअनुषंगाने तपास करता आकाश पवार याने त्याचे साथीदारांसह संगणमतकरून फिर्यादी यांना लुटण्याचा कट केला . तपास करत असताना चारही आरोपी हे मंतरवाडी फाटा, हडपसर येथे येणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा लावून चारही आरोपीतांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

    ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखालीउपनिरीक्षक स्वप्नील पाटील, अंमलदार निलेश देसाई, जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, लक्ष्मण होळकर व किशोर वळे यांच्या पथकाने केली. पथकाने केली आहे.

    चौकट : फिर्यादी यांच्या दुध डेअरीत आकाश पवार याने दहाच दिवस काम केले. यानंतर त्याने त्यांच्याकडे पत्नीच्या उपचारासाठी पगाराची रक्कम आगाऊ मागीतली होती. दहाच दिवसात नव्याने आलेल्या कामगाराला पुर्ण महिण्याचा पगार आगाऊ कसा द्यायचा? म्हणून फिर्यादीने त्यास नकार दिला होता.

    यानंतर आकाश रागाच्या भरात काम सोडून गेला होता. मात्र त्याला फिर्यादीकडे व्यवसायातून दररोज लाखो रुपये जमत असल्याची माहिती होती. तसेच त्यांच्या येण्या-जाण्याचा मार्गही माहित होता. ही बाब त्याने मित्रांना सांगून त्यांना लूटण्याचा कट रचला. प्रत्यक्ष लूट करताना मात्र फिर्यादीकडे फक्त दहा हजाराचीच रक्कम त्यांना सापडली.

    Milk dairy businessman attempt to murder by his worker because he was not give him advance sallery

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!