• Download App
    लष्कर भरती प्रक्रियेतील फसवणुकीचा 'मिलिटरी इंटेलिजन्स'कडून पर्दाफाश, तोतया मेजरला अटक । Military Intelligence exposes fraud in army recruitment process, Totya Major arrested

    लष्कर भरती प्रक्रियेतील फसवणुकीचा ‘मिलिटरी इंटेलिजन्स’कडून पर्दाफाश, तोतया मेजरला अटक

    नाशिक येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटर येथे सुरू असलेल्या भरती मेळाव्याद्वारे सैन्यात भरती करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बनावट लष्करी अधिकाऱ्याचा दक्षिण मुख्यालयाच्या मिलिटरी इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे. मेजर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यास अटक केली आहे.  Military Intelligence exposes fraud in army recruitment process, Totya Major arrested


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : नाशिक येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटर येथे सुरू असलेल्या भरती मेळाव्याद्वारे सैन्यात भरती करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बनावट लष्करी अधिकाऱ्याचा दक्षिण मुख्यालयाच्या मिलिटरी इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे. मेजर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यास अटक केली आहे.

    गणेश वाळू पवार उर्फ बलू कारबारी पवार (रा. हसूल , ता. चांदवड, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.
    मिलिटरी इंटेलिजन्स’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार लष्कराची मेजर ही रैंक असलेला गणवेश परिधान करून देवळाली कॅन्ट परिसरात फिरायचा. भरती मेळाव्यात सहभागी झालेल्या लोकांची कागदपत्रे गोळा केली. त्यांना लष्करात भरती होण्यासाठी मदत करण्याचे आमिष तो दाखवत होता.



    त्याचा ड्रायव्हर नीलेश छबू खैरे यालादेखील पवार याने सशस्त्र दलात नागरी संरक्षण कर्मचारी म्हणून नोकरी मिळवून देण्यासाठी 3,00,000 रुपये दिले होते. अधिक चौकशी केली असता, पवार याने काही व्यक्तींकडून 15 लाख रुपये घेतल्याचेही समजले. इतकेच नव्हे, तर लष्करी गणवेशातील फोटो, चारित्र्य प्रमाणपत्र आणि देवळाली येथील स्टेशन हेडक्वार्टरचा बनावट शिक्का वापरून तयार केलेल्या सर्किंग सर्टिफिकेटचा वापर करत पवार याने गावातील घराच्या बांधकामासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, चांदवड शाखेतून ३९ लाखांचे कर्जही घेतले असल्याचे समोर आले आहे. त्याचा विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Military Intelligence exposes fraud in army recruitment process, Totya Major arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस