• Download App
    Mehul Choksi : पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातली 9 एकर जमीन जप्त!!|Mehul Choksi: Mehul Choksi, mastermind of PNB scam, 9 acres of land in Nashik district confiscated

    Mehul Choksi : पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातली 9 एकर जमीन जप्त!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावून भारताबाहेर पळून गेलेला घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी याची नाशिक जिल्ह्यातील 9 एकर जमीन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जप्त केली आहे. मेहुल चोक्सीने हवाला रॅकेट मधून एसईझेडच्या नावाखाली वेगवेगळ्या नावांनी संबंधित जमीन खरेदी केल्याचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला संशय आहे.Mehul Choksi: Mehul Choksi, mastermind of PNB scam, 9 acres of land in Nashik district confiscated

    इगतपुरी तालुका तालुक्यातील मुंढेगाव बळवंत वाडी येथे ही जमीन असल्याचे सांगितले जात आहे. ही जमीन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जप्त केल्यानंतर या जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



    याखेरीज मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातील अन्य गुंतवणूक देखील जप्त करण्यात आली आहे. गीतांजली जेम्स तसेच नाशिक मल्टी सर्व्हिसेस लिमिटेड अशा नावाने संबंधित जमीन खरेदी आणि गुंतवणूक करण्यात आली होती. आता ही जमीन जप्त करण्यात आल्यानंतर त्यासंबंधीचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.

    मेहुल चोक्सीची आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांनी मिळून जप्त केली आहे. परंतु मेहुल चौक्सी अद्याप भारतात परत आलेला नाही. मात्र त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून त्याअंतर्गतच नाशिक जिल्ह्यातील जमीन जप्त करण्यात आली आहे.

    Mehul Choksi: Mehul Choksi, mastermind of PNB scam, 9 acres of land in Nashik district confiscated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा