• Download App
    शिंदे - फडणवीसांशी भेट : प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला झुलवा की त्यांचेच तळ्यात मळ्यात??meeting prakash ambedkar with devendra fadnavis and eknath shinde

    शिंदे – फडणवीसांशी भेट : प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला झुलवा की त्यांचेच तळ्यात मळ्यात??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना आघाडीत येण्याचा हूल देत आहेत??, त्यांच्याबरोबर झुलवा खेळत आहेत?? की त्यांचे वेगळे तळ्यात मळ्यात सुरू झाले आहे??, असा प्रश्न आता पडायला लागला आहे. meeting prakash ambedkar with devendra fadnavis and eknath shinde

    कारण त्यांनी आज अचानक मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुंबईत इंदू मिल मध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या पुतळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्याचवेळी इंदू मिलच्या नियोजित स्मारकात डॉ. आंबेडकर यांच्या नावाने एक इन्स्टिट्यूशन सुरू करावी, अशी मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या भेटी मागे कोणतेही राजकारण नसल्याचा दावा त्यांनी केला.

    काँग्रेसने कायम चेपले

    पण त्याचवेळी त्यांनी एक राजकीय विधान देखील केले. ते म्हणाले, की काँग्रेसने आम्हाला कायम चेपले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठरवावे, नेमके कोणाबरोबर जायचे ते.

    प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यातून ते काँग्रेस पासूनही दूर चालण्याचे दिसते आहे. त्याचबरोबर त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी आघाडी करण्याची तयारी आहे. पण मूळातच आघाडीचा बॉल उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर देखील किती राहतील?, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत आहे. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीशी झुलवा खेळत आहेत की त्यांचेच तळ्यात मळ्यात सुरू आहे??, अशीही शंका यानिमित्ताने निर्माण होत आहे.

     शिंदे – फडणवीसांबरोबर उघड नाही, पण…

    प्रकाश आंबेडकरांनी शिंदे – फडणवीस भेटीनंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. ते शिंदे – फडणवीसांबरोबर राजकीय दृष्ट्या जाणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत. म्हणजे ते उघडपणे शिंदे – फडणवीसांबरोबर जाणार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. पण मग ते आधी राष्ट्रवादी पासून दूर, मग काँग्रेस पासून दूर असे राहून फक्त उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणार आहेत का?? आणि तसे असेल तर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून फक्त प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेऊन मुंबई सह बाकीच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उतरणार आहेत का??, हा प्रश्न निर्माण होत आहे. प्रकाश आंबेडकरांच्या आजच्या शिंदे – फडणवीस भेटीनंतर आणि काँग्रेसने आम्हाला कायमचे चेपले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ठरवावे कुणाबरोबर जायचे ते, हे वक्तव्य केल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला आहे.

    meeting prakash ambedkar with devendra fadnavis and eknath shinde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!