• Download App
    मुख्यमंत्र्यांसोबत मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक ; विविध मागण्यांवर चर्चा , योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश Meeting of MARD office bearers with the Chief Minister; The Chief Minister directed the administration to discuss various demands and find a suitable solution immediately

    मुख्यमंत्र्यांसोबत मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक ; विविध मागण्यांवर चर्चा , योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

    कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेली अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. Meeting of MARD office bearers with the Chief Minister; The Chief Minister directed the administration to discuss various demands and find a suitable solution immediately


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

    यावेळी सकारात्मक चर्चा होऊन ‘मार्ड’ने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेली अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल.



    यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, पालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता.

    शैक्षणिक शुल्क माफी तसेच जीएसटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्वरित पावले उचलावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्धल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल , तसेच  ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले.यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व राज्य शासन योग्य ती पावले उचलेल असा विश्वास व्यक्त केला.

    Meeting of MARD office bearers with the Chief Minister; The Chief Minister directed the administration to discuss various demands and find a suitable solution immediately

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!