विशेष प्रतिनिधी
मुंबई : मीरा भाईंदर मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मधून घडलेल्या निर्घृण हत्याकांडातून वेगवेगळे खुलासे होत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या हत्याकांडाची दखल घेऊन महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांना त्याच्या तपासा संदर्भात सविस्तर पत्रही पाठवले आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या सिलेक्टिव्ह मानसिकता देखील समोर आल्या आहेत. Meera Bhayander brutal murder
53 वर्षांच्या मनोज सानेने 32 वर्षाच्या सरस्वती वैद्य या युवतीची रिलेशन मधून हत्या केली. की तिने आत्महत्या केली? याचा खुलासा अद्याप पोलीस तपासून व्हायचा आहे. पण त्यानंतर मनोज सानेने मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून, गॅसवर भाजून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याचा प्रकार निश्चितच भयानक आणि मानवतेला कलंक लावणारा आहे. यासंदर्भात पोलीस कसून तपास करत आहेत. मनोज सानेला 6 दिवसांची पोलीस कोठडी देखील न्यायालयाने सुनावली आहे. याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत.
पण या निमित्ताने महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या सिलेक्टिव्ह मानसिकता समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर आणि फेसबुक पोस्ट करून या घटनेची दखल घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याबद्दल विशिष्ट टिप्पणी केली आहे आणि त्यावरून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्या चित्रा वाघ यांनी मोठ्या ताई सुप्रिया सुळे यांच्या विषयी ट्विट करून त्यांची सिलेक्टिव्ह मानसिकता समोर आणली आहे.
मीरा-भाईंदर मध्ये घडलेले हत्याकांड भयानकच आहे. त्यात कुठलीही शंका नाही. पण मंचर मध्ये घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणात अडीच वर्षे संबंधित मुलगी सापडत नव्हती. त्यानंतर ती सापडली. त्याविषयी सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर चकार शब्द काढला नव्हता, याकडे चित्रा वाघ यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.
अर्थात मीरा-भाईंदर मधले हत्याकांड असो अथवा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात घडणारा कुठलाही लव्ह जिहादचा घृणास्पद प्रकार असो त्याचा तीव्र निषेध केलाच पाहिजे. किंबहुना त्यावर कठोरातील कठोर कायद्याची कलमे लावून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. पण या घटनांचा सिलेक्टिव्हली राजकीय वापर करून आपला मानवतावाद दाखविणाऱ्या राजकीय नेत्यांनाही जनतेने चाप बसवला पाहिजे. कारण हे नेते विशिष्ट गोष्टी आणि घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण लव्ह जिहाद सारख्या घटना उघडपणे नाकारतात, ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे.
Meera Bhayander brutal murder
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार? निवडणूक आयोगाने हे दिले संकेत
- काँग्रेसच्या व्यापक मुस्लिम संपर्काची धास्ती म्हणून पवारांची भूमिका मुस्लिम धार्जिणी जास्ती!!
- ‘’… यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे’’ अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप!
- याला म्हणतात काँग्रेस : कर्नाटकात मोफत विजेच्या पोकळ घोषणा; प्रत्यक्षात वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा!!