• Download App
    महापौर किशोरी पेडणेकर : दोन डोस घेऊनही केईएम रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागणMayor Kishori Pednekar: Despite taking two doses, 22 students were infected with corona at KEM Hospital

    दोन डोस घेऊनही केईएमच्या २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, मास्क काढू नका, महापौर पेडणेकरांचे प्रतिपादन

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.Mayor Kishori Pednekar: Despite taking two doses, 22 students were infected with corona at KEM Hospital


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतल्या केईएम रुग्णालय आणि सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालयातल्या सुमारे २२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे.या विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या.

    क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे करोनाचा प्रसार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याविषयी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.



    पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या की , वेगवेगळी महाविद्यालये आणि केईएम रुग्णालयाचे २२ असे मिळून एकूण २९ विद्यार्थी करोनाबाधित आहेत. मला आत्ताच कळालं की, या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. आपले मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सातत्याने सांगत आहेत की, लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क काढू नका, हेच संरक्षण आहे. काही विद्यार्थ्यांना थोडा त्रास जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    त्या पुढे म्हणाल्या, करोना आजही संपलेला नाही. काळजी न करता काळजी घेतली पाहिजे. ही घटना काळजी करण्यासारखी नाही. सौम्य लक्षणं असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.

    Mayor Kishori Pednekar: Despite taking two doses, 22 students were infected with corona at KEM Hospital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाचा निकाल 3 महिन्यांत; सुप्रीम कोर्टात 20 ऑगस्टला पुन्हा सुनावणी

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हायला हवी; निवडणुका जवळ, बैठका आवश्यक

    Eknath Shinde : मंत्री-आमदारांच्या वर्तनामुळे एकनाथ शिंदे नाराज; स्पष्ट इशारा- जबाबरीने वागा अन्यथा कावाईचा बडगा उगारावा लागेल