• Download App
    मराठा आरक्षण : खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र । Maratha reservation MP Chhatrapati Sambhaji Raje's fast till death from 26th February, letter to CM

    मराठा आरक्षण : खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

    Maratha reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मराठा आरक्षणासाठी शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रही लिहिले आहे. दि. 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे. Maratha reservation MP Chhatrapati Sambhaji Raje’s fast till death from 26th February, letter to CM


    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मराठा आरक्षणासाठी शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रही लिहिले आहे. दि. 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.

    आपल्या पत्रात संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. १७ जून २०२१ रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र आज आठ महिने उलटले तरी या मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसत नाही. यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदान, मुंबई येथे मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे.

    आपल्या तीन पानी पत्राच्या अखेरीस त्यांनी लिहिले की, मराठा आरक्षण मिळणे ही दीर्घकालीन व न्यायालयीन प्रक्रिया आहे. मात्र, तोपर्यंतच्या काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये, होणाऱ्या अन्यायाची तीव्रता कमी व्हावी, यासाठी सकल मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आमचा हा लढा आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण वरील प्रश्न शासकीय पातळीवर सोडवू शकतो, गरीब मराठा समाजासाठी आपण यामध्ये नक्कीच पुढाकार घ्याल, ही अपेक्षा बाळगतो, असेही त्यांनी लिहिले आहे. खासदार संभाजी छत्रपती यांच्या या पत्रावर आता मुख्यमंत्री ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

    Maratha reservation MP Chhatrapati Sambhaji Raje’s fast till death from 26th February, letter to CM

    महत्त्वाच्या बातम्या

    हिजाबच्या वादात एसएफजेकडून चिथावणी : व्हिडिओ जारी करून भारतातील मुस्लिमांना भडकावले; म्हणाले- वेगळा देश उर्दिस्तान करा; आम्ही पैसा देऊ

    पाच वर्षात बिहार मध्ये सर्वाधिक, ७२१, महाराष्ट्रात २९५ दंगली

    पंतप्रधानांनी मोजली काँग्रेसची पापे : नरेंद्र मोदी म्हणाले, … अन्यथा लाहोरवर तिरंगा फडकला असता!!

    बैलगाडा शर्यत : अमोल कोल्हेंची घोडीवर बारी; म्हणाले, राजकारणात करणार नाही कुरघोडी!!

    चिनी टेलिकॉम कंपनी Huawei वर सरकारची मोठी कारवाई, करचुकवेगिरीच्या आरोपावरून आयटी विभागाचा छापा

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!