• Download App
    Mansainika's letter arrow: Hanuman Chalisa sought permission in Shiv Sena Bhavan temple - Aarti's permission !!

    मनसैनिकाचा पत्र बाण : शिवसेना भवन मंदिरात मागितली हनुमान चालीसा – आरतीची परवानगी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची “लाव रे तो व्हिडिओ” उत्तर सभा आज ठाण्यात रंगणार असताना मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक पत्र बाण सोडत अजब मागणी केली आहे. Mansainika’s letter arrow: Hanuman Chalisa sought permission in Shiv Sena Bhavan temple – Aarti’s permission !!

    तुम्ही हिंदू – आम्ही हिंदू शिवसेना भवन हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही मंदिर. मग आम्हाला शिवसेना भवनातील भवानी मातेसमोर हनुमान चालीसा आणि आरती करण्याची परवानगी द्या अशी मागणी यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.



    यशवंत किल्लेदार यांनी आपल्या पत्र बाणातून शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये शरसंधान केले आहे. संपलेल्या पक्षाचे नगरसेवक फोडायला कोट्यवधी रुपये खर्च का करावे लागतात?? हनुमान चालीसा शिवसेना भवनासमोर लावल्यानंतर कारवाईचा बडगा संपलेल्या पक्षावर का उगारावा लागतो?? शिवसेना हिंदुत्ववादी आहे हे खरेच, पण शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही हे तुम्हाला वारंवार का सांगावे लागते?? असे एका पाठोपाठ एक प्रश्‍न बाण या पत्र बाणातून यशवंत किल्लेदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले आहेत.

    “हिंदू जननायक” ठाण्यात पोस्टर्स

    राज ठाकरे यांची उत्तर सभा आज ठाण्यात रंगणार आहे. ठाण्यामध्ये या सभेची भव्य पोस्टर्स लागली आहेत. त्यात राज ठाकरे यांचा उल्लेख “हिंदू जननायक” असा करण्यात आला आहे.

    राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज ठाकरे यांचे मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचे वक्तव्य प्रचंड गाजले. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या उत्तर सभेत ते काय बोलणार??, याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रात आहे. त्याआधी यशवंत किल्लेदार यांनी पत्र बाण सोडून उद्धव ठाकरे यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला.

    Mansainika’s letter arrow : Hanuman Chalisa sought permission in Shiv Sena Bhavan temple – Aarti’s permission !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस