विशेष प्रतिनिधी
मुंबई : लता मंगेशकर यांनी डॉ. आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाहीत, असे वक्तव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. Mangeshkar did not even sing the songs of Patel and Nehru Statement of Balasaheb Ambedkar
लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी का गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होते. कोणाची काही तत्वे असतात.
रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यानंतर काही व्यक्ती, संघटना यांनी आंबेडकरी चळवळीची गाणी गायली नसल्याच्या कारणावरून आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यावरून नेटीझन्समध्ये उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या.
Mangeshkar did not even sing the songs of Patel and Nehru Statement of Balasaheb Ambedkar
महत्त्वाच्या बातम्या
- शिवाजी पार्कला स्मशानभूमी बनवू नका; प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत; लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद
- संपकरी एसटी कामगार विलीनीकरणासाठी आग्रही; कामगार गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी!!
- आमदार नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल
- एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ! ठाण्यात बॅनर झळकल्याने आश्चर्य; अक्षरे पुसून वाद मिटविण्याचा प्रयत्न