ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे.Mandatory quarantine for passengers arriving from Dubai; Strict rule of the state government on the background of Omaicron
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान ओमायक्रॉनचा धोका असलेल्या 12 देशांची यादी भारत सरकारने तयार केली आहे. या 12 देशातील प्रवासी अनेकदा दुबईमार्गे आपल्या पुढील प्रवासाला जात असतात. दरम्यान एकमेकांशी संपर्क आल्याने ओमायक्रॉनचा संसर्ग जास्त वाढतो.
त्यामुळे दुबईहून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नियम कठोर
१)सात दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे .
२) दुबईतून आलेल्या प्रवाशांना सार्वजनिक परिवहन सेवा वापरता येणार नाही.
३)या प्रवाशांची प्रवासाची सोय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जावी.
४)विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली नाही तरी पुढील सात दिवस त्यांच्याशी मुंबईपालिकेच्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत संपर्क ठेवला जाणार.
५)सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार
६)प्रवासी बाधित नसला तरी त्याला पुढील सात दिवस सतर्क राहावे लागणार असून जर प्रवासी बाधित आढळला तर त्याला क्वारंटाईन केले जाणार.
७)दुबईहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या पण महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात जाणाऱ्या प्रवाशांशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समन्वय साधला जाणार.
Mandatory quarantine for passengers arriving from Dubai; Strict rule of the state government on the background of Omaicron
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये येताय, दारूबंदी पाळावीच लागणार, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले स्पष्ट
- अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांसामोर जोडले हात ; म्हणाले – दादा , मास्क लावा !
- ओमायक्रॉनबाबत आयआयटी कानपूरच्या संशोधकांचा थरकाप उडविणारा अंदाज, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या प्रारंभी गाठणार कळस
- मिग २१ लढाऊ विमान जैसलमेरमध्ये कोसळले ; दुर्घटनेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू