विशेष प्रतिनिधी
सोलापूर – एखादा माणूस अन्नाविना किती दिवस जगू शकतो?तर त्याचे उत्तर २१ दिवस.प्रत्येक माणसांचे शरीर ६० टक्के पाण्याने भरलेले आहे. मात्र,गेल्या १४ वर्षांपासुन अन्न न खाणारा अवलिया सोलापूर जिल्ह्यात आहे. तो केवळ गूळ आणि शेंगदाणे खाऊन जगतो आहे. Man who has not eaten for 14 years; The diet is based on peanuts and jaggery
सोलापूर जिल्ह्यातील वडाचीवाडी मधील नागनाथ गोरे असे या शेतकरी अवलियाचे नाव आहे.शरीर संपदा निरोगी राखण्यासाठी, आरोग्य दायी श्रेष्ठ पौष्टिक आहार म्हणुन गुळ – शेंगदाणे खात असल्याचे गोरे सांगतात.पेशाने शेतकरी असलेले नागनाथ गोरे केवळ शेंगदाणे आणि गुळ इतकच खातायत.वयाच्या ४८ वर्षापासून ते आजतागायत ६२ व्या वर्षी देखील ते शेंगदाणे गुळ खातायत.एकेदिवशी गोरे घरात बसले असताना त्यांनी शेंगदाणे गुळ सहज एकदा खाल्ले आणी सवयच लागली गेली.ती पुढे तशीच आजही कायम राहिलीय.
गोरे गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य देखील राहिले आहेत.केवळ घरीच नव्हे तर बाहेर लग्न समारंभ असोत की अन्य कार्यक्रम गोरे कार्यक्रमाला हजेरी लावतात.मात्र तिथे ते पाणी देखील पित नाहीत.गोरे शेंगदाणे गुळ इतकच खात असल्याचे अनेकांना माहिती झाले असल्याने गावातील लोक असोत की जवळचे नातेवाईक देखील त्यांना जेवायचा आग्रह धरीत नाहीत.ते त्यांना एका प्लेट मध्ये शेंगदाणे गुळ आणुन देतात.गावातच ते एक मुलगा,सुन,एक नातु यांच्या समवेत कुडाच्या घरात राहताहेत.अन्न न खाणार्या नागनाथ गोरे ची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली असुन अनेक जणांना याबाबत कुतूहल निर्माण झालंय.