• Download App
    लेटर बॉम्ब नव्हे फुसका फटाका ! मलिक म्हणाले वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो वानखेडे म्हणतात Nice jokeMalik says Wankhede plants drugs in people's homes, says Wankhede

    NAWAB MALIK VS SAMEER WANKHEDE: लेटर बॉम्ब नव्हे फुसका फटाका ! मलिक म्हणाले वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो वानखेडे म्हणतात Nice joke

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: नवाब मलिक यांनी आज निनावी पत्र समोर आणत समीरवानखेडेंवरआणखी आरोपकेले आहेत . हे पत्र आपल्याला एनसीबीतल्याच एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लिहिलं आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्ज प्लांट करत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता या प्रकरणी समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले अकारण मला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलं जातं आहे त्याबाबत आता मी काय भाष्य करणार ?यानंतर त्यांनी या वक्तव्याला हास्यास्पद देखील म्हटलंय.Malik says Wankhede plants drugs in people’s homes, says Wankhede

    काय म्हणाले समीर वानखेडे ?

    नवाब मलिक यांनी समोर आणलेलं पत्र म्हणजे मोठा जोक आहे. त्यातले सगळे आरोप निराधार, बिनबुडाचे आणि निखालस खोटे आहेत. त्यामुळे याबाबत मी काय प्रतिक्रिया देणार? जे मी केलंच नाही जे अकारण मला बदनाम करण्यासाठी केलं जातं आहे त्याबाबत काय भाष्य करणार असं म्हणत समीर वानखेडे यांनी या पत्राची खिल्ली उडवली आहे.

    राष्ट्रवाद काँग्रसेचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत.

    ‘त्या’ पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

    मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. मागील दोन वर्षापासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. मागील वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग अँगलची चौकशी सोपविण्यात आली आणि माजी महासंचालक श्री. राकेश अस्थाना यांनी एसआयटीचं गठन करुन आपला चेला कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचं प्रभारी बनवून मुंबईमध्ये ड्रग अँगलची चौकशी सोपवली आणि सोबत समीर वानखेडे जे (DRI) मुंबईमध्ये काम करत होते त्यांना गृहमंत्री अमित शाह यांना सांगून नियमबाह्य पद्धतीने डीआरआयने लोन बेसिसवर एनसीबी मुंबईमध्ये झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केलं.

    राकेश अस्थाना जे सर्वांनाच माहिती आहेत की, ते किती इमानदार अधिकारी आहेत, त्यांनी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही मार्गाने बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग प्रकरणात अडकवून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचे आदेश दिले.

    केस दाखल केल्यानंतर केपीएस मल्होत्रा आणि समीर वानखेडे यांनी या कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली आणि कोट्यवधी रुपये उकळून राकेश अस्थाना यांना देखील त्यातील काही हिस्सा दिला. बॉलिवूडच्या या कलाकारांकडून (दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकार, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि अर्जुन रामपाल) सगळे पैसे त्यांचे वकील अयाज खान यांनी गोळा करुन दिले.

    अयाज खान यांची मैत्री समीर वानखेडेंशी आहे. ते एनसीबी कार्यालयात कधीही येऊ-जाऊ शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. ते समीर वानखेडेला बॉलिवूडकडून दर महिन्याला वसूली करुन देतो. तसंच जेव्हा समीर वानखेडे एखाद्या बॉलिवूड कलाकाराला पकडतो तेव्हा तो त्यांना अयाज खान याला आपला वकील म्हणून नेमण्यास सांगतो. असे सगळे उल्लेख आणि आरोप या पत्रामध्ये आहेत. हे पत्र म्हणजे लेटर बॉम्ब की फुसका फटाका हे लवकरच स्पष्ट होईल.

    Malik says Wankhede plants drugs in people’s homes, says Wankhede

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!