• Download App
    महाराष्ट्राला आयफोन, टीव्ही निर्मितीचे हब बनवणार : वेदांताचे अनिल अग्रवाल यांची घोषणा; फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून राजकारण तापले|Making Maharashtra a Hub for iPhone, TV Manufacturing Vedanta's Anil Agarwal Announces; Politics heated up after Foxconn moved to Gujarat

    महाराष्ट्राला आयफोन, टीव्ही निर्मितीचे हब बनवणार : वेदांताचे अनिल अग्रवाल यांची घोषणा; फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून राजकारण तापले

    वृत्तसंस्था

    मुंबई : वेदांता आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन संयुक्तपणे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी गुजरातमध्ये प्लांट उभारणार आहे. हा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रात होणार असल्याची चर्चा असताना तो गुजरातमध्ये गेल्याने सद्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये टीका सुरू झालेली आहे.Making Maharashtra a Hub for iPhone, TV Manufacturing Vedanta’s Anil Agarwal Announces; Politics heated up after Foxconn moved to Gujarat

    दरम्यान, महाराष्ट्रातील आज दिवसभरातील तापलेल्या राजकारणात एक नवीन व मोठी बातमी समोर आली आहे. वेदांता लिमिटेड भारतात आयफोन आणि टिव्ही उपकरणांच्या निर्मितीचं हब बनवणार आहे. अशी माहिती खुद्द वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी दिली. ते सीएनबीसी टीव्ही 18 या वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी ही माहिती त्यांनी दिली.



    चेअरमन अग्रवाल म्हणाले की, आयफोन आणि इतर टेलिव्हिजन उपकरणे तयार करण्यासाठी कंपनी पश्चिम भारतातील महाराष्ट्रात एक केंद्र (हब) तयार करेल. गुजरात जेव्ही प्लांटसाठी हे एक प्रकारचे फॉरवर्ड इंटिग्रेशन असणार आहे.

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला?
    स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर!”

    गुजरातमध्ये प्लांट, दोन्ही कंपन्या 1.54 लाख कोटींची गुंतवणूक

    वेदांता समूह आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन संयुक्तपणे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी गुजरातमध्ये प्लांट उभारणार आहे. हा भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट असेल. यासाठी समूहाने गुजरात सरकारसोबत दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा ग्रुप सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट, डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट आणि सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि टेस्टिंग युनिट स्थापन करेल. या प्रकल्पासाठी दोन्ही कंपन्या 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

    1 लाख लोकांना मिळणार रोजगार

    अहमदाबादेत 1000 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 लाख लोकांना रोजगारही मिळणार आहे. प्रस्तावित सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन युनिट 28nm तंत्रज्ञान नोड्सवर काम करेल. डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिट लहान, मध्यम आणि मोठ्या अॅप्लिकेशन्ससाठी जनरेशन 8 डिस्प्ले तयार करेल.

    IT आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि ISM यांनी अद्याप अॅप्लिकेशनचा पहिला राउंड मंजूर केलेला नाही. वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

    रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वाचे : पंतप्रधान

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाविषयी ट्विट करून म्हटले आहे की, ‘हा सामंजस्य करार भारताच्या सेमिकंडक्टर उत्पादनाच्या महत्त्वाकांक्षेला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हे सहायक उद्योगांसाठी एक प्रचंड इकोसिस्टम तयार करेल आणि आमच्या एमएसएमईंना मदत करेल.

    Making Maharashtra a Hub for iPhone, TV Manufacturing Vedanta’s Anil Agarwal Announces; Politics heated up after Foxconn moved to Gujarat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल