प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मीरा भायंदर, वसई – विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी लखमी गौतम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. Major reshuffle in Maharashtra Police Force including Mumbai; Sadananda Date ATS Chief
महाराष्ट्रात महापालिका निवडणूका जाहीर करण्या आगोदर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बदल्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले आहेत. मुंबई पोलीस दलातील चारही सहपोलीस आयुक्त बदलण्यात आले आहेत. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सत्यनारायण चौधरी यांच्या खांद्यावर देण्यात आली असून सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तपदावरून अपर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पुणे आयुक्तपद रिक्त ठेवण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.
कोणत्या अधिका-यांची झाली बदली?
- विनयकुमार चौबे पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त
- मीरा भाईदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते हे राज्याच्या दाहशतविरोधी विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक
- अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांचीही बदली करण्यात आली आहे.
- मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांचीही बदली
- मुंबई वाहतूक विभागाची जबाबदारी प्रवीण पडवळ यांच्याकडे देण्यात आली आहे.
Major reshuffle in Maharashtra Police Force including Mumbai; Sadananda Date ATS Chief
महत्वाच्या बातम्या