वृत्तसंस्था
नागपूर : विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोने जोडणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. Major cities in Vidarbha will be connected to Nagpur by mini metro; Union Minister Nitin Gadkari’s announcement
अमरावतीत महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी यांनी ही घोषणा केली. पुढील दीड वर्षांत नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेतल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.
मिनी मेट्रो या आठ डब्ब्यांच्या असतील. अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासा इतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली असून नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
Major cities in Vidarbha will be connected to Nagpur by mini metro; Union Minister Nitin Gadkari’s announcement
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम
- Aryan Khan case : संजय राऊत म्हणाले – साक्षीदाराचा दावा धक्कादायक; नवाब मलिक म्हणाले- सत्याचाच विजय होईल!
- Aryan Khan Drug Case : फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?
- राहुल आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अल्लू मियाँला लखनौमध्ये अटक, फसवणूक आणि खंडणीचे प्रकरण